प्रमोद भाऊराव काकडे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. प्रमोद हे आपला लहान भाऊ वासुदेव काकडे याला सोबत घेऊन शेतात फवारणी करायला गेले होते. दुपारी ४ वाजताच्या दरम्यान १५ लिटर प्लास्टिक बादलीने फवारणीसाठी विहिरीतून पाणी काढत असताना प्रमोदचा अचानक तोल जाऊन तो विहिरीत पडला. सोबत असलेल्या लहान भावाला पोहता येत नसल्याने तो नागरिकांच्या मदतीसाठी गावात गेला. परंतु विहिरीत खोल पाणी असल्याने आणि पोहता येत नसल्याने प्रमोदचा जागीच मृत्यू झाला. मृत प्रमोदकडे सात एकर शेती आहे. त्यांनी यावर्षी नव्यानेच चार एकर शेती विकत घेतली होती. मेहनती शेतकरी म्हणून त्यांची गावात ओळख होती. त्यांच्या अपघाती निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदतीची मागणी होत आहे.
कान्हाळगाव येथे विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:46 AM