लोकमत न्यूज नेटवर्कबोरीअरब : येथील भारतीय स्टेट बँक शाखेत पाच महिन्यांपासून कर्जासाठी शेतकरी येरझारा मारत आहे. सोबतच कर्जाचे पुनर्गठणही होत नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी बँकेसमोर आंदोलन केले.परिसरातील अनेक शेतकरी पीककर्जासाठी बँकेच्या चकरा मारत आहे. खरीप पेरणी आटोपूनही कर्ज मिळाले नाही. सोयाबीन कापणीला सुरुवात होत आहे. तरीही कर्ज मिळत नसल्याने व जुन्या कर्जाचे पुनर्गठण होत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. त्यामुळे भारतीय किसान संघाच्या पुढाकारात सर्व पक्षीय शेतकऱ्यांनी बँकेसमोर धरणे आंदोलन केले.यवतमाळचे जनरल मॅनेजर सुहास ढोले यांनी बोरीअरब गाठून शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यांना १५ दिवसात कर्ज देण्याची ग्वाही दिली. इतर मागण्याही तातडीने निकाली काढण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.शिवाय मुद्रा लोनचे उद्दिष्ट पूर्ण करणे, शेतीसाठी कंपाऊंड, पाईपलाईन, पशु खरेदीसाठी कर्ज देण्याची मागणी निवेदनातून केली. आंदोलनात संजय डेहणकर, गजानन बोरकर, गोलू तिवारी, नंदकिशोर तिवारी, सुनील दाढे, अविनाश तिवारी, नवीन तिवारी, नीलेश बोरकर, संतोष लांडे, गफ्फार शेख, संतोष पावडे, अशोक बंगाळे, रमेश चौधरी, विष्णू कावरे, मोहन गुघाने, फिरोज पठाण, प्रवीण जयस्वाल आदी शेतकरी सहभागी होते.
बोरीअरब येथे शेतकऱ्यांचे पीककर्जासाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 6:00 AM
यवतमाळचे जनरल मॅनेजर सुहास ढोले यांनी बोरीअरब गाठून शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यांना १५ दिवसात कर्ज देण्याची ग्वाही दिली. इतर मागण्याही तातडीने निकाली काढण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
ठळक मुद्देभारतीय किसान संघाचा पुढाकार : १५ दिवसात कर्ज देणार