पुसद : येथील खरेदी विक्री संघाचे प्रभारी व्यवस्थापक म.रा.राठोड हे शैक्षणिकदृष्ट्या अपात्र असल्यामुळे त्यांना पदमुक्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आॅडीट रिपोर्टमध्ये राठोड पदावर कार्यरत असल्याबाबत ताशेरे ओढण्यात आले आहे. त्यांना दिलेले वेतनही नियमबाह्य असून वेतनाची रक्कम वसुलपात्र असल्याचे नमूद आहे. या विषयी अनेक तक्रारी येत असून सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे कक्ष अधिकारी, पणन संचालक, विभागीय सहनिबंधक, उपनिबंधक यांनी पुसद खरेदी विक्री संघाचे प्रभारी व्यवस्थापक यांच्या विरुद्ध कारवाईचे निर्देश दिले. तरीसुद्धा कारवाई करण्यात आली नाही. याबाबत वसंतनगर पोलीस ठाण्यात आणि सहायक निबंधक सहकारी संस्था पुसद यांच्याकडे लेखी तक्रार नोंदविण्यात आली आहे. १४ आॅगस्टपूर्वी राठोड यांच्याविरुद्ध कारवाई न झाल्यास विभागीय व न्यायालयीन कारवाई सुरू करण्याचा इशारा सभासद शेतकरी नारायण अंभोरे, ज्ञानेश्वर तडसे, नारायण पुलाते, अॅड. सचिन नाईक, अॅड. गजानन देशमुख, अॅड. चंद्रशेखर शिंदे, अॅड. प्रशांत देशमुख, दिलीप पोले, अॅड. गजानन साखरे, अशोक चव्हाण आदींनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
पुसद खविसंच्या प्रभारी व्यवस्थापकावर शेतकऱ्यांचा रोष
By admin | Published: August 15, 2016 1:26 AM