शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

शेतकरी खासगी बँकांच्या चक्रव्यूहात

By admin | Published: May 31, 2016 2:02 AM

सततची नापिकी, कर्जाचा वाढता डोंगर अशा परिस्थितीत पीककर्जासाठी शेतकरी खासगी बँकांच्या चक्रव्यूहात

यवतमाळ : सततची नापिकी, कर्जाचा वाढता डोंगर अशा परिस्थितीत पीककर्जासाठी शेतकरी खासगी बँकांच्या चक्रव्यूहात अडकत आहे. या बँका कर्ज तर देतात मात्र वसुलीसाठी शेतकऱ्यांना डांबून ठेवणे, मारहाण करणे असे प्रकारही करतात. एक हप्ताही थकला तरी घरावर नोटीस लावून शेतकऱ्याची बदनामी करतात. असाच प्रकार दारव्हा तालुक्यातील शेंद्री येथे घडला. या प्रकाराने अपमानित झालेल्या शेतकऱ्याने चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच विष प्राशन केले. यामुळे खासगी बँकांच्या वसुलीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपुरा पाऊस आणि सततच्या नापिकीने जिल्ह्यातील शेतकरी देशोधडीला लागला आहे. राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँकेचे कर्ज मोठ्या प्रमाणात अनेक शेतकऱ्यांवर थकीत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांसाठी जिल्हा व राष्ट्रीयकृत बँकांचे दरवाजे बंद झाले आहे. या शेतकऱ्यांना खासगी बँकांचा आधार घ्यावा लागतो. अल्प मुदती कर्ज या बँका शेतकऱ्यांना देतात. त्यासाठी चढा व्याजदरही आकारला जातो. परंतु गरजवंत शेतकऱ्यांना पैशाची गरज असते. त्यामुळे तो व्याजाकडे न पाहता कर्ज घेतो. परंतु त्या कर्जाचा हप्ता थकला की या बँकांचे वसुली कर्मचारी घरी येतात. धमकी देऊन पैशाची वसुली करतात. घरावर नोटीस लावतात. एवढेच नाही तर घरावर मोठ्या अक्षरात हे घर संबंधित बँकेला गहाण असल्याचे लिहितात. यामुळे शेतकरी अपमानित होतो.दारव्हा तालुक्यातील शेंद्री येथील धनंजय वानखडे या शेतकऱ्यासोबतही असाच प्रकार झाला. त्याने महिंद्र फायनान्सकडून घेतलेल्या एक लाख रुपयाच्या कर्जाचा केवळ एक हप्ता थकला. बँकेने तगादा लावून त्याच्या घरावर नोटीस लावली. हा प्रकार सांगण्यासाठी तो जिल्हाधिकारी कार्यालयात आला आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीपूर्वीच त्याने कक्षासमोर विषाचा घोट घेतला. सध्या तो रुग्णालयात उपचार घेत आहे. यापूर्वीही जिल्ह्यात असे प्रकार घडले आहे. काही महिन्यांपूर्वी महिंद्रा कंपनीने घाटंजी तालुक्यातील एका शेतकऱ्याला कर्ज वसुलीसाठी डांबून ठेवले होते. त्याला मारहाणही करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसात तक्रार झाली. परंतु पुढे काय झाले, हे कळायला मार्ग नाही. असाच प्रकार नेर येथे घडला होता. मोहन चौधरी या शेतकऱ्याला महिंद्रा फायनान्सच्या गुंडांनी बेदम मारहाण केली होती. असे अनेक प्रकार या खासगी बँकांकडून जिल्ह्यात सुरू आहे. परंतु त्यांच्यावर कोणतेही नियंत्रण नाही. एकीकडे जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियानाचा डांगोरा पिटविला जात आहे. शेतकऱ्यांना थेट मदत केल्याचा कांगावा प्रशासन करीत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येत घट झाल्याची आकडेमोड करीत आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील शेतकरी खासगी बँकांच्या चक्रव्यूहात अडकले आहे. (नगर प्रतिनिधी)४जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोर दारव्हा तालुक्यातील शेंद्री (बु) येथील धनंजय राजेंद्र वानखडे या युवकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर ही वेळ का आली, या बाबत सखोल चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी पोलीस विभागाला दिले. धनंजय सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आला, त्यावेळी जिल्हाधिकारी खासदार आणि सीईओसोबत अपंगांच्या प्रश्नावर चर्चा करीत होते. त्यावेळी ही घटना घडली. सदर युवकाच्या तक्रारीत सुरज गोविंद देवरे याने केलेली फसवणूक आणि महिंद्रा फायनान्स कंपनीकडून जबरदस्तीने वसुली करीत असल्याचे म्हटले आहे. याची चौकशी करून दोषींवर कारवाईचे निर्देश दिले. खासगी सावकारी किंवा खासगी व्यक्तीने पैसे घेवून फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही व्यक्तीने टोकाचा निर्णय न घेता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. दलालाकडून ९६ हजारांनी फसवणूक४दारव्हा तालुक्यातील शेंद्री येथील प्रमोद भोयर, छगन वानखडे, सुरेश भागने, प्रल्हाद वानखडे, रत्नाबाई भोयर, सुरेश चौधरी आदी शेतकऱ्यांची पीककर्ज देतो म्हणून तब्बल ९६ हजारांनी फसवणूक करण्यात आली. सुरज गोविंदराव देवरे याने अ‍ॅक्सिस बँकेचा एजंट असल्याची बतावणी करून फसविले. काही शेतकऱ्यांना पीककर्जाचे चेकही दिले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना पैशाची अत्यंत निकड असते. त्यामुळे मिळेल तेथून पैसा उपलब्ध करण्याचा प्रयत्न शेतकरी करतात. याचाच फायदा घेत गावागावात दलाल सक्रिय झाले आहे. बँकेकडून कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करीत आहे. पीककर्ज तर मिळत नाही, उलट शेतकऱ्यांनाच आर्थिक फटका बसतो. ग्रामीण भागात शेतकऱ्यांची अडचण हेरून असे दलाल सक्रिय आहे.