रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कर्जमाफीच्या गोंधळात जिल्ह्यातील तब्बल साडेतीन लाख शेतकरी खरीप पीक कर्जाला मुकल्याचे वास्तव बँकांनी वितरित केलेल्या कर्जाच्या आकडेवारीवरून पुढे आले आहे. तीन लाख ९९ हजार ६६८ शेतकºयांना १८३६ कोटी रुपये कर्ज वितरणाचे उद्दीष्ट असताना बँकांनी प्रत्यक्षात ५९ हजार १६० शेतकºयांना ४८५ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले. आता या शेतकºयांना नवीन कर्जासाठी पुढील वर्षाचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकºयांनी कर्जमाफीची मागणी लावून धरली. शासनाने शेतकºयांच्या आंदोलनानंतर कर्जमाफीची घोषणा केली. मात्र अद्यापपर्यंत या कर्जमाफीचा गोंधळ संपायचे नाव घेत नाही. शेतकºयांच्या खात्यात कर्जाची रक्कम अद्यापही पडली नाही. परंतु या दरम्यान निर्माण झालेल्या गोंधळात अनेक बँकांनी शेतकºयांचे पीक कर्ज वितरितच केले नाही. सहकार विभागाने जिल्ह्यातील पीक कर्जाच्या स्थितीचा अहवाल नुकताच तयार केला. त्यात ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील बँकांनी वितरित केलेल्या कर्जाची आकडेवारी दिली आहे. यातून जिल्ह्यातील केवळ २६ टक्के शेतकºयांनाच खरीप हंगामात कर्ज मिळाल्याचे दिसून येते.यवतमाळ जिल्ह्यात तीन लाख ९९ हजार ६६८ शेतकºयांना कर्ज वाटपाचे उद्दीष्ट होते. त्यांना १८३६ कोटी ३१ लाख रुपये कर्ज देण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात बँकांनी ५९ हजार १६० शेतकºयांना ४८५ कोटी ७४ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. सुमारे ७४ टक्के कर्जवाटपाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यात बँका असमर्थ ठरल्या. यातही राष्टÑीयकृत बँकांनी आपला हात आखडता घेतला. जिल्ह्यातील १७ राष्टÑीयकृत बँकांनी १४ टक्के कर्जाचे वितरण केले. त्यात चार राष्टÑीयकृत बँकांनी केवळ पाच ते दहा टक्केच कर्ज वितरित केले. प्रत्यक्षात १७ राष्टÑीयकृत बँकांनी १७१ कोटी ५२ लाख रुपयांचेच कर्ज शेतकºयांना दिले. बँक आॅफ इंडियाने केवळ पाच टक्के, इंडियन ओव्हरसीस बँकेने ९ टक्के तर युको आणि युबीआय बँकेने केवळ सहा टक्के कर्ज वितरित केले.सर्वाधिक कर्जमाफीचा गोंधळ जिल्हा बँकेला सोसावा लागला. त्याउपरही या बँकेने ५४ टक्के शेतकºयांना कर्जाचे वितरण केले. यामुळे बहुतांश शेतकºयांना दिलासा मिळाला. परंतु राष्टÑीयकृत बँकांवर अवलंबून राहणाºया शेतकºयांना मात्र कर्जास मुकावे लागले. ऐन हंगामात कर्ज न मिळाल्याने शेतकºयांना सावकाराच्या दारात जावे लागले. आता धान्य माल घरी येत असताना सावकार वसुलीसाठी तगादा लावत आहे. एकंदरित कर्जमाफीचा फायदा अद्याप झाला नसलातरी कर्जाला मुकल्याचे दिसत आहे. आता नवीन कर्जासाठी पुढील वर्षीचीच प्रतीक्षा करणेच शेतकºयांच्या नशिबी आहे.केवळ दोन हजार शेतकºयांनाच दहा हजारांची मदतशासनाने कर्जमाफीची घोषणा करताना शेतकºयांना खरीप हंगाम पेरणीसाठी तत्काळ दहा हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात यवतमाळ जिल्ह्यातील दोन हजार १५९ शेतकºयांनाच दहा हजार रुपयांचे कर्ज मिळाले. दहा हजार रुपये आज-उद्या मिळतील या आशेवर शेतकरी होते. परंतु शासनाच्या घोषणेनंतरही हजारो शेतकरी दहा हजार रुपयालाही मुकले.
कर्जमाफीच्या गोंधळात शेतकरी कर्जास मुकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 1:01 AM
कर्जमाफीच्या गोंधळात जिल्ह्यातील तब्बल साडेतीन लाख शेतकरी खरीप पीक कर्जाला मुकल्याचे वास्तव बँकांनी वितरित केलेल्या कर्जाच्या आकडेवारीवरून पुढे आले आहे.
ठळक मुद्देसाडेतीन लाख शेतकरी : आता नवीन कर्ज पुढील वर्षी