लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कर्जमाफीची घोषणा होऊन दीड महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला, मात्र अद्याप साधे तत्काळ १० हजारांचे कर्जही मिळू शकले नाही. तर कर्जमाफीसाठीचे फॉर्मही बँकेने भरून घेतले नाही. या विरुद्ध संतप्त झालेल्या शेतकºयांनी गुरुवारी शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीच्या पुढाकारात रामनगरच्या (कारेगाव) अलाहाबाद बँकेत धडक दिली.१४ आॅगस्टच्या रास्ता रोको आंदोलनासाठी शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने गुरुवापासून जिल्हा दौरा सुरू केला आहे. पहिल्या दिवशी येळाबारा, रामनगर, कारेगाव, रुईवाई, तिवसा आदी ठिकाणी सभा घेण्यात आल्या. रामनगर येथे समितीचे पदाधिकारी जाताच संकटग्रस्त शेतकºयांनी बँकेविषयी व्यथा मांडली.सरकारने तत्काळ मदत म्हणून केलेले १० हजार रुपयांचे कर्ज अजूनही मिळाले नाही. तसेच दीड लाख कर्जमाफ केल्याचा जीआर निघूनही अद्याप तेही माफ झाले नाही, याबाबत कारेगाव परिसरातील शेतकºयांनी समितीला सांगितले. समितीच्या पदाधिकाºयांनी शेतकºयांना घेवून थेट बँकेत धडक दिली. या शाखेमार्फत एकाही शेतकºयाला १० हजार मिळाले नाही. कर्जमाफीचे फॉर्मही भरुन घेतले नाही, अशी माहिती खुद्द बँक अधिकाºयांनी दिली. अखेर शेतकºयांचा संताप पाहता उद्यापासून १० हजार रुपयांचे कर्जवाटप करू, अशी हमी बँक अधिकाºयांनी दिली. यावेळी शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीच्या विजयाताई धोटे, निमंत्रक देवानंद पवार, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष मनीष पाटील, राजेंद्र हेंडवे, मिलिंद धुर्वे, राजू गावंडे, हिंमत पाटमासे व शेतकरी उपस्थित होते.
रामनगरच्या बँकेवर शेतकºयांची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 10:11 PM
कर्जमाफीची घोषणा होऊन दीड महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला, मात्र अद्याप साधे तत्काळ १० हजारांचे कर्जही मिळू शकले नाही.
ठळक मुद्देअधिकाºयांना विचारला जाब : उद्यापासून वाटणार १० हजारांचे कर्ज