लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : मनरेगाअंतर्गत मंजूर झालेल्या विहीर बांधकामाचा मोबदला तीन वर्षांपासून मिळाला नाही. त्यामुळे निंगनूर येथील पाच शेतकऱ्यांनी मंगळवारपासून तहसीलसमोर आमरण उपोषण सुरू केले. मात्र प्रशासनाने त्वरित मोबदला देण्याची ग्वाही दिल्याने बुधवारी सायंकाळी उपोषण मागे घेण्यात आले.आदिवासी शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक वेठीस धरणाºया तत्कालीन ग्रामसेवकासह संबंधितांवर कठोर कारवाई करून वरिष्ठांनी न्याय मिळवून द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. २०१२-१३ मध्ये मनरेगाअंतर्गत पाच शेतकऱ्यांना विहीर बांधकामासाठी मंजुरी मिळाली. त्यामुळे निंगनूर येथील शेतकरी काळूराम टारपे, मारोती टारपे, दत्ता टारपे, उकंडा मुरमुरे व संभाजी घावस यांनी शेतात खोदकाम केले. मात्र अद्याप त्यांना मोबदला मिळाला नाही.बांधकामाचा मोबदला मिळण्यासाठी तत्कालीन ग्रामसेवक घावडे यांनी मस्टर आॅनलाईन करण्यास जाणीवपूर्वक कुचराई केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. प्रत्यक्षात काम करूनही सदर ग्रामसेवकाने लालसेपोटी आम्हाला मोबदल्यापासून वंचित ठेवले आणि प्रत्यक्षात कामे न केलेल्या लाभार्थ्यांना मात्र ‘लक्ष्मी दर्शन’ करताच कामाचा मोबदला मिळवून दिला, असा त्यांचा आरोप आहे. आता चौकशीचे आश्वासन मिळाल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले.स्थायी समितीत प्रश्न उपस्थितउपोषणाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते राम देवसरकर यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांनी संबधित शेतकऱ्यांच्या प्रलंबिंत समस्यांबाबत येतया स्थायी समिती सभेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार विजय खडसे, जिल्हा परिषद सदस्य चिंतागराव कदम, दतराव शिंदे, सहायक गटविकास अधिकारी खुडे, उत्तम पांडे, शेषराव गुडे यांच्यासह निंगनूरचे नागरिक उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत उपोषणमागे घेण्यात आले.
निंगनूर येथील शेतकऱ्यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 11:37 PM