शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

शेतकऱ्यांनो बोगस खतापासून सावधान; सेंद्रीयच्या नावाने बनवाबनवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:13 PM

मिश्रखत आणि सेंद्रीय खताच्या नावावर बोगस खत शेतकऱ्यांवर थोपविले जात आहे.

ठळक मुद्देदरवाढीच्या सुमारास बोगस कारखाने उदयाला

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खताच्या किमती शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहे. यामुळे स्वस्त खत खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. हीच संधी हेरत बोगस कारखानदारांनी पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. असे खत थेट शेतकऱ्यांच्या दारात पोहचत आहे. काही जिल्ह्यामध्ये हा प्रकार उघड झाल्यानंतर कृषी आयुक्तालयाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मिश्रखत आणि सेंद्रीय खताच्या नावावर बोगस खत शेतकऱ्यांवर थोपविले जात आहे.शेतीकरिता डीएपी, १०:२६:२६, २०:२०:०:१३, म्युरिट आॅफ पोटॅश, सिंगल सुपर फॉस्पेट यासारखी खते बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी होतात. या खतांच्या किमती १४७५ रूपयांपर्यंत पोहोचल्या आहे. त्या तुलनेत मिश्रखतांच्या किमती कमी आहेत. यामुळे शेतकरी मिश्रखत वापरण्याकडे वळत आहेत.शेतकऱ्यांची निकड लक्षात घेत मिश्रखतामध्ये कंपन्यांनी त्यामध्ये असणारे एनपीके हे घटक कमी अधिक प्रमाणात टाकण्यास सुरूवात केली आहे. पोत्यावर दर्शविलेले हे घटक खतात आहे किंवा नाही हे सांगणे अवघड आहे. असे काही बोगस खत बाजारात आले आहे. मराठवाड्यात अशा खतांचे कारखाने सिल झाले आहेत. त्यांचा हा माल सर्वत्र वळविला जाण्याचा धोका आहे. यामुळे भरारी पथकांनी अशा खतांचा शोध सुरू केला आहे. बाजारात उपलब्ध असलेले खत नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. तर काही मिश्रखतांना विक्री बंदीचे आदेश दिले आहेत. नमुन्याच्या तपासणीनंतर मिश्रखतातील ‘कन्टेन्ट’ कळणार आहेत. सेंद्रीय खताच्या नावावर बोगस खत बजारात येत आहे. त्यामध्ये कुठले घटक आहेत, त्याची उपयोगीता, यावर कृषी विभागाने प्रश्नचिन्ह उभे केले आहे. असे खत शेतकऱ्यांनी वापरले तर पैसे व्यर्थ जाण्याचा धोका आहे.१८:१८:१० ऐवजी ९:९:५मिश्रखताच्या निर्मितीत पुरेसे ‘कन्टेन्ट’ वापरले जात नाही. यामुळे काही राज्यात मिश्रखताच्या वापरावरच बंदी आहे. महाराष्ट्रात अशी बंदी नाही. मात्र त्यामध्ये निर्देशित घटक नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. १८:१८:१० हे घटक ९:९:५ या प्रमाणात काही कंपन्यांच्या उत्पादनात आढळले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. वेळेपूर्वीच असे खत शोधण्याचे आव्हान कृषी विभागापुढे आहे.

टॅग्स :agricultureशेती