लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: पुसद तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा यासाठी माळपठार वरील जवळपास ११७ गावातील शेतकरी शेतमजूर यांनी खंडाळा ता. पुसद येथे शनिवारी सकाळी रस्ता रोको करण्यात आला. यामुळे मुंबई पुणे वरून पुसदमार्गे यवतमाळ येणारी व जाणारी वाहतूक जवळपास २ तास खोळंबली. पुसद तालुका विद्युत पुरवठा सुरळीत करणे, पिकांची आणेवारी घोषित करून पीक विमा देणे, माळपठारावरील सर्व शिक्षण करणाºया मुला मुलींचे शाळेचे शुल्क माफ करणे, तलावाचे काम त्वरित चालू करणे, पैंनगंगा नदीवर गेट बसवण्यात यावे या सर्व मागणीसाठी माळपठारवरील ११७ गावातील लोकांनी चक्का जाम करण्यात आला. यासाठी माळमठर समितीचे मार्गदर्शक सदाशिव नाईक, अध्यक्ष बी .जी .राठोड, उपाध्यक्ष सदबाराव मोहटे, शिवसेनेचे उपसभापती गणेश पण्गिरे, विकास जामकर, माजी तालुका प्रमुख शिवसेना बाबूशिंग आडे, जी .प .सदस्य विवेक मस्के, उल्हास राठोड, गजानन उघडे, वसंता चीरमारे, रवींद्र महल्ले व सर्व शेतकरी गावकरी उपस्थित होते.
यवतमाळ जिल्ह्यातील खंडाळा येथे शेतकऱ्यांचा रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 11:59 AM
पुसद तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा यासाठी माळपठार वरील जवळपास ११७ गावातील शेतकरी शेतमजूर यांनी खंडाळा ता. पुसद येथे शनिवारी सकाळी रस्ता रोको करण्यात आला.
ठळक मुद्देप्रलंबित मागण्यांसाठी केले आंदोलन