ऑनलाईन लोकमतघाटंजी : ग्रामविकास व जलसंधारण विभागातर्फे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, या महत्त्वाकांक्षी योजनेतून धरणातून सुपीक गाळ काढून शेतकऱ्यांनी तो आपल्या शेतात टाकून शेतीसमृद्धीची गुढी उभारावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.तालुक्यातील सावरगड येथे तलावातील गाळ काढण्याच्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, शेतात गाळ टाकल्याने शेती उत्पादनात वाढ होणार आहे. गाव क्षेत्रात पाणीसाठा वाढून पिण्याच्या पाण्याची समस्याही दूर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. गुढीपाडव्याचे औचित्य साधून पंचायत समिती सदस्य सुनंदा भुजाडे यांच्या अध्यक्ष्यतेत सावरगड येथे गाळ काढण्याच्या कामाची सुरुवात झाली. अस्मिता संस्था, यवतमाळ यांनी केअरिंग फ्रेंड्स मुंबई व विकासगंगा संस्था घाटंजी यांच्या सहकार्याने हे काम सुरू केले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, यवतमाळचे तहसीलदार सचिन शेजाळ, सूरज शिंदे, रणजीत बोबडे, सरपंच हरिदास खडसे, उपसरपंच सुहास सरगर, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. धरणांमध्ये दरवर्षी साठत असलेल्या गाळामुळे पाणी साठवणूक क्षमतेत घट होत आहे. हा गाळ उपसा करून शेतात टाकल्यास धरणांची मूळ साठवणूक क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात भरीव वाढ होते, असे मत उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी व्यक्त केले. तहसीलदार सचिन शेजाळ, शिंदे, रणजीत बोबडे यांनीही मार्गदर्शन केले.सावरगड सिंचन तलावातून ४० हजार घनमीटर गाळ निघणार असून तो शेतात टाकण्याची तयारी शेतकऱ्यांनी दर्शविली. या कामाचा लाभ सावरगड परिसरातील पाच गावांतील शेतकºयांना होणार असल्याचे संगीता गायकवाड यांनी सांगितले. अमित गाडबैल, विनोद गुजलवार यांनी क्षेत्रीय प्रक्रिया पूर्ण केली.
शेतकऱ्यांनी शेतात गाळ टाकून समृद्धीची गुढी उभारावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 11:56 PM
ऑनलाईन लोकमतघाटंजी : ग्रामविकास व जलसंधारण विभागातर्फे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, या महत्त्वाकांक्षी योजनेतून धरणातून सुपीक गाळ काढून शेतकऱ्यांनी तो आपल्या शेतात टाकून शेतीसमृद्धीची गुढी उभारावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.तालुक्यातील सावरगड येथे तलावातील गाळ काढण्याच्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, शेतात गाळ टाकल्याने शेती उत्पादनात ...
ठळक मुद्देराजेश देशमुख : सावरगड येथे जलयुक्त शिवारअंतर्गत धरणातील गाळ उपसा कार्यक्रम