हमीदरापेक्षा दीड हजार कमी : पेरणीच्या तोंडावर बाजार समितीत आवक वाढलीज्ञानेश्वर मुंदे - यवतमाळ शेंगदाणे आणि तेलाचे दर तेजीत असताना शेतकर्यांच्या भुईमुगाचे दर मात्र अचानक घरसले आहे. सुरवातीला ३२00 ते ३७00 पर्यंंत असलेला भुईमुग आता २६00 ते ३१00 पर्यंंत खाली आला आहेत. हमीदरापेक्षा दीड हजार कमी दराने खरेदी होत असताना एकही आमदार शब्द बोलायला तयार नाही. ऐन पेरणीच्या तोंडावर व्यापार्यांनी शेतकर्यांची कोंडी केली आहे.जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकर्यांनी मोठय़ा प्रमाणात भुईमूग विक्रीस आणला आहे. यवतमाळ, पुसद आणि आर्णी येथील बाजार समितीत मोठी आवक आहे. पेरणीच्या तोंडावर शेतकरी मिळेल त्या भावात भुईमूग विकण्याच्या तयारीत आहे. या परिस्थितीचा फायदा व्यापारी घेत आहेत. सुरुवातीला तेजीत असणार्या भुईमुगाचे दार अचानक गडगडले आहे. चांगल्या भुईमुगाला ३१00 पर्यंंत भाव दिला जात आहे. मात्र त्यातही कट्टी लावली जात आहे. कट्टी वाढवून देण्यासाठी यवतमाळात व्यापार्यांनी दोन दिवस खरेदीही बंद ठेवली होती. प्रशासक आणि व्यापार्यांत वादही झाला. अखेर यावर तोडगा काढून ३0 किलोच्या पोत्यामागे अर्धा किलो कट्टी घेण्याचा निर्णय झाला.
भुईमुगाचे भाव पाडून शेतकर्यांची कोंडी
By admin | Published: June 06, 2014 12:12 AM