आॅनलाईन लोकमतउमरखेड : कागदपत्रांची पूर्तता करूनही रोटावेटरच्या अनुदानासाठी उंबरठे झिजवून कंटाळलेल्या एका शेतकऱ्याने चक्क येथील तालुका कृषी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळीच त्याच्या हातातील विषारी बॉटल हिसकल्याने मोठा अनर्थ टळला. बुधवारी दुपारी ३ वाजता घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली.ज्ञानेश्वर मारोतराव शिंदे रा. झाडगाव असे शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी समृद्ध शेतकरी योजनेअंतर्गत ५० टक्के अनुदानावर रोटवेटर घेतले. १ लाख रूपयांच्या या रोटावेटरचे सर्व कागदपत्र १५ नोव्हेंबर रोजी तालुका कृषी कार्यालयात सादर केली. १५ दिवसांत अनुदानाची रक्कम मिळणे अपेक्षित होते. परंतु या शेतकºयाच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. महिन्याभरापासून तो तालुका कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजवत होता. ५ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदन देऊन आपबिती कथन केली.दरम्यान, बुधवार ६ डिसेंबर रोजी ज्ञानेश्वर शिंदे तालुका कृषी कार्यालयात पोहोचले. दुपारी ३ वाजताच्या सुमारास तालुका कृषी अधिकारी एन.आर. कुमरे यांच्या कार्यालयासमोर विष प्राशनाचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेले शिवाजी शिंदे यांनी ज्ञानेश्वरच्या हातातील विषाची बॉटल हिसकावली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. येथील कृषी कार्यालयाच्या मनमानी कारभाराने अनेक शेतकरी वैतागले आहेत. तालुका कृषी अधिकारी प्रभारावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा संयमाचा बांध फुटत असून त्यातून ही घटना घडली.
उमरखेडमध्ये शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 10:55 PM
कागदपत्रांची पूर्तता करूनही रोटावेटरच्या अनुदानासाठी उंबरठे झिजवून कंटाळलेल्या एका शेतकऱ्याने चक्क येथील तालुका कृषी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केला.
ठळक मुद्देकृषी कार्यालय : अनुदान न मिळाल्याने रोष