शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कोरोनात वाचलेली शेती कंपन्यामुळे धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 3:56 PM

कोट्यवधीचा नफा मिळूनही समाधानी नसलेल्या कंपन्या शेतकऱ्यांना बुडवायला निघाल्या आहेत. यामुळे कोरोनातून वाचलेली शेती आता कंपन्यांच्या विश्वासघातकी प्रवृत्तीने धोक्यात आली आहे.

ठळक मुद्देकर्जमुक्तीही अपूर्ण बोगस खत, बियाण्याने विश्वास ठेवायचा कुणावर?

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : देशभरात उद्योग व्यवसाय ठप्प पडले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अशा स्थितीत शेतीतील रोजगार टिकून आहे. या व्यवसायालाही पोखरण्याचे काम बियाणे आणि खत कंपन्यांनी सुरू केले आहे. कोट्यवधीचा नफा मिळूनही समाधानी नसलेल्या कंपन्या शेतकऱ्यांना बुडवायला निघाल्या आहेत. यामुळे कोरोनातून वाचलेली शेती आता कंपन्यांच्या विश्वासघातकी प्रवृत्तीने धोक्यात आली आहे.

आजपर्यंत बियाणे आणि खतावर शेतकऱ्यांचा विश्वास होता. यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आले. बोगस खताचा पुरवठा झाला. पेरणीनंतरच हा प्रकार उघड झाला. तोपर्यंत बोगस बियाणे विकलेल्या कंपन्यांचे फावले. यातच निसर्ग प्रकोपाने शेतशिवार थरथरत आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत शेतकऱ्यांचे शेकडो प्रश्न जसेच्या तसे आहेत. यामुळे अनेक पिढ्या शेती कसल्यानंतरही शेतीची अवस्था सुधारली नाही. कधी पाऊस जास्त पडतो तर कधी कमी बरसतो. या स्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहणारे सरकार दिसत नाही. कोरोनाच्या संकटकाळात शेती हा एकमेव उद्योग वाचला आहे. इतर उद्योगांनी हात वर केले आहे. अशा स्थितीत बेरोजगारांचा संपूर्ण भार शेतीवरच आला आहे. शेतीचे आर्थिक गणित बिघडलेले आहे. यावर्षी जिल्ह्यातील बहुतांश भागात १० ते १५ दिवस पावसाचा खंड पडला आहे. सिंचन करण्यासाठी वीज मिळत नाही. कृषी फिडरवर १६ तासांचे भारनियमन आहे. यात तीन दिवस दिवसा आणि चार दिवस मध्यरात्री वीज पुरवठा होत आहे. या बिकट स्थितीत दिवसा वीज मिळावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने वीज वितरणने कुठल्याही उपाययोजना केल्या नाही. अनेक भागात वायरमनचा तुटवडा आहे. तर वीज पुरवठा करणारे खांबही वाकले आहे.

यावर्षी बोगस बियाणे आणि खतांचा पुरवठा झाला आहे. शेतकºयांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. अशा १२०० वर तक्रारी दररोज पुढे आल्या आहेत. यातून १० हजार हेक्टरला फटका बसला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यास यंत्रणा कमी पडत आहे. या स्थितीचा फायदा कंपन्या घेत आहे. शेतीचे संपूर्ण अर्थचक्रच बिघडले आहे. कर्जमुक्तीचा मोठा हातभार शेतकऱ्यांना लाभणार होता. पण रिझर्व्ह बँकेने राष्ट्रीयकृत बँकांना कुठल्याही सूचना दिल्या नाहीत. यामुळे लाखावर शेतकरी कर्जात अडकून पडले आहेत.हवामान खात्याने दिला दगाहवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. प्रारंभी पाऊस पडला. मात्र नंतर पाऊस गायब झाला. आता अशा स्थितीत शेतकऱ्यांचे लाखमोलाचे बियाणे अडकले आहेत.

 

टॅग्स :agricultureशेतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस