लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : ऐन हिवाळ्यातच तालुक्यातील शेलू येथे पाणी पेटले आहे. गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असल्याने त्यांनी गुरूवारी थेट तहसीलवर धडक दिली.शेलू येथे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली. गेल्या अनेक दिवसांपासून गावकऱ्यांना कामधंदा सोडून पाण्यासाठी पायपीट करावी लाग तांहे. महिला आणि पुरूषांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने कोणतेही नियोजन न केल्याचा आरोप गावकरी करीत आहे. गावकºयांना पिण्यासाठी पाणी मिळत नसताना रस्त्यांनी माभ धो-धो पाणी वाहात आहे. यामुळे गावकरी प्रचंड संतापले आहे.ग्रामपंचायत सचिव आणि तलाठी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल देण्यास टाळाटाळ करतात. ते गावात उपस्थित नसतात. त्यामुळे गावकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. आता ऐन हिवाळ्यातच गावात पाणी संकट निर्माण झाले. दरवर्षी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विहीर अधीग्रहण केले जाते. मात्र यावर्षी अद्याप विहिरी अधिग्रहीत करण्यात आली नाही. त्यामुळे पाण्यासाठी महिलांसह पुरुषांना पायपीट करावी लागत आहे.पाण्याच्या समस्येमुळे त्रस्त झालेल्या शेलू येथील महिला, नागरिकांनी गुरूवारी थेट तहसीलवर धडक दिली. तहसीलदार यू. डी. तुंडलवार यांना निवेदन देऊन कायमस्वरूपी पाणीटंचाई सुपुष्टात आणावी अशी मागणी केली. यावेळी बाबूसिंग चव्हाण, विजय घंगाळे, नितीन गावंडे, ऊमेश राठोड, संदीप कातकीडे, बाळू देवकर, सुभाष पवार, संतोष घंगाळे, सुनील कातकीडे, विलास गावंडे, हिम्मत नागमोडे, संदीप चव्हाण, माया गावंडे, शांताबाई पवार, पार्वता कुडमते, गिरजाबाई मुधळकर, लिलाबाई चव्हाण, रेखा पवार, कांदा पवार, पंचफुला जाधव यांच्यासह गावकरी उपस्थित होते.पाणीटंचाई पाचवीलाच पूजलीशेलू येथे दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होते. प्रशासन केवळ विहीर अधिग्रहण करून तात्पुरती उपाययोजना करते. यापेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना केल्यास गावाची पाणी समस्या निकाली निघू शकते. प्रशासनच्या उदासीनतेमुळे गावकऱ्यांना दरवर्षी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. ही पाणीटंचाई शेलू वासीयांच्या पाचवीलाच पूजली आहे. प्रशासनाने आता कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.लोणबेहळ येथे पाणीटंचाईबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यात शेलू ग्रामपंचायतीला तथा पंचायत समिती अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. याची तातडीने अंमलबजावणी केल्यास पाणीटंचाई दूर होईल.- स्वाती येंडेजिल्हा परिषद सदस्य
आर्णी तालुक्यात हिवाळ्यातच तीव्र पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 11:54 PM
ऐन हिवाळ्यातच तालुक्यातील शेलू येथे पाणी पेटले आहे. गावकºयांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असल्याने त्यांनी गुरूवारी थेट तहसीलवर धडक दिली.
ठळक मुद्देशेलूचे नागरिक तहसीलवर धडकले : ग्रामपंचायत उदासीन, सचिव, तलाठी गावातच येत नसल्याचा आरोप