शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
3
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
4
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
5
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
6
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
7
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
8
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
9
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
10
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
11
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
12
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
13
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
14
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
15
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
17
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
18
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
19
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
20
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'

पुसदमध्ये १८ दिवसांपासून उपोषण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 6:00 AM

महिनाभरापूर्वी अमरावतीच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी पुसदला भेट दिली. ते येण्यापूर्वीच शहर ठाणेदार प्रमेश आत्राम यांनी पोलीस चौकीच्या आजूबाजूच्या फळ व भाजी विक्रेत्यांना हातगाडे हटविण्यासाठी लेखी सूचना पत्र दिले होते. त्यानंतर पोलिसांनी जबरीने त्यांचे फळगाडे हटविले. तेव्हापासून सर्व विक्रेते बेरोजगार झाले आहे.

ठळक मुद्देफळ व भाजी विक्रेते । बिडवई कॉम्प्लेक्ससमोरील खुल्या जागेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : पोलिसांनी जबरीने हुसकावून लावलेल्या येथील फळ विक्रेत्यांनी तहसीलसमोर उपोषण सुरू केले. या उपोषणाला आता १८ दिवस लोटले. मात्र अद्याप तोडगा निघाला नाही. आता उपोषणकर्त्यांनी बीडवाई कॉम्प्लेक्ससमोरील खुल्या जागेवर हातगाड्यांवर व्यवसाय करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली आहे.महिनाभरापूर्वी अमरावतीच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी पुसदला भेट दिली. ते येण्यापूर्वीच शहर ठाणेदार प्रमेश आत्राम यांनी पोलीस चौकीच्या आजूबाजूच्या फळ व भाजी विक्रेत्यांना हातगाडे हटविण्यासाठी लेखी सूचना पत्र दिले होते. त्यानंतर पोलिसांनी जबरीने त्यांचे फळगाडे हटविले. तेव्हापासून सर्व विक्रेते बेरोजगार झाले आहे. हातगाड्या न हटविल्यास कारवाई करण्याची धमकीसुद्धा पोलिसांनी दिली होती.गेल्या २० वर्षांपासून सदर फळ आणि भाजी विक्रेते तेथे व्यवसाय करीत होते. अस्थायी स्वरूपाचे हातगाडे लावून शांततेचा भंग न करता केवळ पोटापाण्यासाठी त्यांनी आपली दुकाने थाटली होती. वाहतुकीस कोणताही अडथळा नव्हता. फळ व व भाजी विक्रेते केवळ चार फुटांवर वसलेले होते. मात्र आता पोलीस चौकीच्या बाजूला १२ फूट लांब असलेले पोलीस वाहन उभे करण्यात आले. खासगी बसेसचे त्याच ठिकाणी बसस्थानक आहे. त्यांचा वाहतुकीला अडथळा होत नाही का, असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला.गेल्या १८ जुलै रोजी शहर ठाणेदार प्रमेश आत्राम यांनी या व्यावसायिकांना पत्र लिहून हातगाडीवरील व्यवसायामुळे रहदारीत अडथळा होतो, असे कारण नमूद करून दोन दिवसांत पर्यायी जागा देण्याची ग्वाही दिली होती. दुकाने हटली, मात्र अद्याप त्यांना पर्यायी जागा मिळाली नाही. त्यामुळे फळ व भाजी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. ठाणेदारांनी हातगाड्या हटवून आता ४० दिवस झाले. मात्र जागा उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे बीडवई कॉम्प्लेक्ससमोरील खुल्या जागी अथवा पर्यायी व्यवस्था होईपर्यंत जुन्याच ठिकाणी हातगाड्या लावू देण्याची मागणी एका निवेदनातून जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.निवेदनावर विष्णू सरकटे, शेख शकूर, शेख अन्सार शेख उस्मान, शेख इसराईल शेख मिया, शेख मजिद शेख मुस्तफा, योगेंद्र पारसे, गणेश खाडे, रुखमाबाई सुकळकर, अशोक चोपडे, विनोद पराते आदींच्या स्वाक्षºया आहे.लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कायमचउपोषण सुरू होऊन आता १८ दिवस लोटले. मात्र अद्यापही उपोषणाला लोकप्रतिनिधी अथववा अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही. सामान्य उपोषणकर्त्यांची कुणी साधी चौकशी केली नाही. त्यामुळे उपोषणकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान शनिवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.वजाहत मिर्झा यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष खान मोहमद खान यांनीही उपोषणाला भेट दिली.

टॅग्स :Strikeसंप