उमरखेड : बेघर भूमिहिनांना घरकुलाचा लाभ मिळावा, या मागणीसाठी तालुक्यातील ढाणकी येथील नागरिकांनी येथील तहसीलसमोर मंगळवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणात महिलांसह ३५ नागरिक सहभागी झाले आहे. ढाणकी येथील टेंभेश्वरनगरातील दशवार्षिक व बेघर भूमिहीन घरकूल लाभार्थ्यांना सनद मिळावी, यासाठी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतु १५ आॅगस्टपर्यंत ही मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे नागरिकांनी उपोषणाला प्रारंभ केला आहे. त्यात देवराव शेळके, विजय धोपटे, मुन्ना भंडारे, बाळू वाडेकर, मच्छिंद्र मुनेश्वर, सैयद जाकीर स.मुनीर, किशोर जाधव, बाळू कल्याणकर, सैयद अलिम स.ताजू, मारोती सोनोने, कोंडाबाई काळबांडे, शांताबाई कवडे, निर्मलाबाई कुलाले, इसराईल खान, रमेश उपेवाड, दिलीप पडोळे, रत्नमाला कोनगिर, अनिता काळे, सुनंदा दवने, सुभद्रा सावतकर, बेबी गिरबिडे, कमल कदम, रंजना गडमवाड, विमल आवळे, यल्लपा इडेवाड, शेख शाहरूख, ज्ञानेश्वर उपेवाड, अनिल मनेवाड, नीलाबाई देवकर, लक्ष्मीबाई गोदमले, वंदना शिदलवाड, तानाजी गंगरवाड, श्रावण देवकर, अंबादास भगत आदी सहभागी झाले आहे. (शहर प्रतिनिधी)
ढाणकीच्या नागरिकांचे तहसीलपुढे उपोषण
By admin | Published: August 18, 2016 1:21 AM