लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : नागपूर-तुळजापूर महामार्गावरील आर्णी ते धनोडा दरम्यान कोसदनी घाटात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या चिखलावरून वाहने स्लीप होऊन सातत्याने अपघात घडत असल्याने वाहनधारक दहशतीत सापडले आहे.सध्या नागपूर ते तुळजापूर या नवीन महामार्गाचे रुंदीकरण केले जात आहे. आर्णी तालुक्यात रुंदीकरणाच्या कामाला गती आली आहे. उन्हाळ्यापूर्वीच सर्व काम पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र रस्ता बांधकाम कंपनीच्या दुर्लक्षामुळे अद्याप काम पूर्ण झाले आहे. रंदीकरणासाठी ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. या खोदकामातील माती आता रस्त्यावर पसरली आहे. पावसामुळे मातीचा चिखल निर्माण झाला आहे. त्यावरून वाहने घसरून अपघात होत आहे.आर्णी ते धनोडा दरम्यान मार्गक्रमण करताना वाहन चालकांची मोठी कसरत सुरु आहे. या दरम्यान कोसदनी घाट लागतो. नंतर एक नाला लागतो. हा घाट आणि नाला पार करताना चिखलामुळे दुचाकी वारंवार स्लीप होत आहे. दररोज या ठिकाणी छोटे-मोठे अपघात घडत आहे. मोठी वाहनेसुद्धा चिखलामुळे स्लीप होत आहे. यातून मोठा अपघात घडण्याची शक्यता बळावली आहे. याकडे रस्ता बांधकाम कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभगाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाहनधारकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. मात्र रस्ता बांधकाम कंपनी व प्रशासानाकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे.पहिल्याच पावसामुळे बंधारा गेला वाहूनमहामागाचे रुंदीकरण अत्यंत संथगतीने होत आहे. पावसाळ्यापूर्वीच काम होणे अपेक्षित होते. ते अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे आता अपघाताची शक्यता निर्माण झाली. कोसदनी घाटातील रस्ता खोदून ठेवण्यात आला. पावसामुळे हा ४00 मीटरचा रस्ता अत्यंत दयनीय झाला. त्यावर जागोजागी खड्डे पडले. त्यात टोंगळाभर पाणी साचून संपूर्ण रस्त्यावर चिखल पसरला. त्यामुळे घाटातून रस्ता पार करताना वाहनधारकांना कसरत करावी लागते. वाहने स्लीप होऊन अपघात होत आहे. घाटतील नाल्यावर पुलाचे काम सुरु करताना जुना पूल तोडला. तेथे बाजूलाच मातीचा बंधारा टाकला. त्यावरुन वाहतूक सुरू आहे. आठ दिवसांपूर्वी हा बंधारा वाहून गेल्याने आर्णी ते माहूर दरम्यान तब्बल दहा तास वाहतूक ठप्प पडली होती.
कोसदनी घाटात अपघाताची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 9:49 PM
नागपूर-तुळजापूर महामार्गावरील आर्णी ते धनोडा दरम्यान कोसदनी घाटात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या चिखलावरून वाहने स्लीप होऊन सातत्याने अपघात घडत असल्याने वाहनधारक दहशतीत सापडले आहे.
ठळक मुद्देचिखलाचे साम्राज्य : वाहनचालक दहशतीत, रस्ता बांधकाम कंपनीचे दुर्लक्ष