लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात वनविभागामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या २२ कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गेल्या वर्षभरापासून केलेल्या कामाची दखल घेत वनरक्षक, वनमजूर यांना प्रशस्तीपत्र व शील्ड देण्यात आले.या आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रसंतांचे जीवन प्रचारक वसंत ढवळे , सामाजिक वणीकरण लागवड अधिकारी भेंडे, नविन आष्टी सरपंच अरूणा गजरे, पंचायत समिती सदस्य मनले, सेवानिवृत्त शिक्षक बी.टी. उरकुडे, जनार्दन ढोक, गजानन भोरे मंचावर विराजमान होते. यावेळी उपस्थितांच्या हस्ते शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आयोजकांच्यावतीने अतिथींचे स्वागत करण्यात आले.यावेळी वर्षभरापासून वनविभागाच्या जलयुक्त शिवारच उत्कृष्ठ काम करणारे प्रकाश देशभ्रतार, वनपाल धनराज तुमडाम, वनरक्षक मंगल केंद्रे, ममता लांडगे, रूपेश ठाकरे, सुनील कोटजावरे, निता दडमल, विनोद अहिरे, अतिक्रमण काढून १३ कोटी वृक्ष लागवडीचे काम करणाऱ्या वनरक्षक रसिका अवथळे, वन्यप्राण्यासाठी पानवठे श्रमदानातून तयार करणे व अंगार पथकामध्ये उत्कृष्ठ काम करणे यासाठी वनरक्षक स्वाती कडू, वृक्षारोपणकरिता रोपवाटिका तयार केल्याबद्दल इंद्रपाल भगत, वनसंरक्षक व संवर्धनाचे कामाबद्दल वनपाल नरेंद्र धुळे, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, रोपवन कामाकरिता वनपाल राजु साबळे, वनरक्षक नरेश परतेकी, वनगुन्ह्याचा शोधकाम करणारे अर्जून कोरडे, अंगार पथकमध्ये उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल वनमजूर विठ्ठल उईके, सुरेश कुंभरे, अरूण महाडुले, रमेश उईके, गजानन खंते, अरूण यावले, गजानन शेंद्रे अशा बावीस कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र व शिल्ड देवून सत्कार करण्यात आला. संचालन प्रकाश देशभ्रतार, प्रास्ताविक सुनील कोटजावरे, आभार रसिका अवथळे यांनी मानले. कार्यक्रमाला वनविभागाचे सर्व कर्मचारी, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य व नागरीक उपस्थित होते.
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या २२ कर्मचाºयांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 10:34 PM
येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात वनविभागामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या २२ कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गेल्या वर्षभरापासून केलेल्या कामाची दखल घेत वनरक्षक, वनमजूर यांना प्रशस्तीपत्र व शील्ड देण्यात आले.
ठळक मुद्देवर्षभरातील कामाची घेतली दखल : आष्टी वनपरिक्षेत्र कार्यालयाचा उपक्रम