लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : वर्षभरापासून गरीब आणि गरजवंतांच्या मदतीसाठी विविध उपक्रम राबविणाºया येथील ‘माणूसकीची भिंत’च्या सदस्यांचा ज्ञानेश्वर संस्थानच्यावतीने एका सोहळ्यात सत्कार करण्यात आला.ज्ञानेश्वर संस्थानच्यावतीने चातुर्मास समाप्ती आणि ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळ्यानिमित्त भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात माणुसकीची भिंतच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. गत वर्षभरापासून पुसद शहरात माणूसकीच्या भिंततर्फे विविध उपक्रम राबविले जात आहे. समितीचे सदस्य स्वखर्चाने उपक्रम राबवितात. वृद्धाश्रमात जाऊन रक्षाबंधन, भाऊबीज साजरी करणे, फराळाचे वाटप करणे, अनाथ मुलांना दिवाळीनिमित्त नवीन कपडे, ब्लँकेट अािण गुणवंतांचे कौतुक तसेच ईद निमित्त मुस्लीम बांधवांना गुलाबाचे फुल देऊन स्वागत करणे आदी उपक्रम राबविले जातात. या उपक्रमाची दखल घेत गजानन जाधव, प्रल्हाद गुहाडे, मधुकर वाळूकर, रामदास सानप, बालाजी बंडेवार, सुशांत महल्ले, आकाश शिंदे, प्रभाकर पाटील, संदीप आगलावे, दिलीप वावधाने, दत्तात्रय जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेश महाराज बाकडे, बिपीन चिद्दरवार, दीपक आसेगावकर, अतुल प्रतापवार, पांडुरंग गादेवार, राजाराम चिद्दरवार, अभिजित सांगळे, राधिका दवणे, सुधाकर डुबेवार, सीता जाधव यांच्यासह कथा श्रवण करण्यासाठी आलेले भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘माणूसकीची भिंत’ सदस्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:04 PM
वर्षभरापासून गरीब आणि गरजवंतांच्या मदतीसाठी विविध उपक्रम राबविणाºया येथील ‘माणूसकीची भिंत’च्या सदस्यांचा ज्ञानेश्वर संस्थानच्यावतीने एका सोहळ्यात सत्कार करण्यात आला.
ठळक मुद्देसेवाभावी कार्याची दखल : पुसदच्या ज्ञानेश्वर संस्थानचा उपक्रम