शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

यवतमाळ जिल्ह्यातील महिला ठाणेदारांनी आणली गुन्हेगारी नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 11:43 AM

संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा ठाण्याच्या कारभार महिला ठाणेदाराने हाती घेतला. अल्पावधीतच गुन्हेगारांमध्ये आपला वचक निर्माण करून गुन्हेगारी नियंत्रणात आणली.

ठळक मुद्देसामूहिक प्रयत्नदारव्हा तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित

मुकेश इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा ठाण्याच्या कारभार महिला ठाणेदाराने हाती घेतला. अल्पावधीतच गुन्हेगारांमध्ये आपला वचक निर्माण करून गुन्हेगारी नियंत्रणात आणली. दारू, मटका, अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घातला. वरिष्ठांचे पाठबळ आणि सहकार्यांची साथ मिळत असल्याने दारव्हा तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे.दारव्हा ठाणेदार म्हणून रिता उईके यांनी काही महिन्यापूर्वी पदभार स्वीकारला. त्या दारव्ह्याच्या पहिल्या महिला ठाणेदार ठरल्या. आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यशैलीने त्यांनी आपल्या कार्याचा तालुक्यात ठसा उमटविला. त्यांनी प्रभार हाती घेताच पूर्वीची एकाधिकारशाही संपुष्टात आणली. बीटनिहाय अधिकारी व कर्मचारी नेमले. विकेंद्रीकरणामुळे इतरांनाही अधिकार मिळाले. त्यातून गुन्हेगारी नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्न होताना दिसत आहे. त्याचे परिणामही दिसू लागले आहे. दारव्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८१ गावे येतात. कर्मचारी मात्र ६० आहे. आधीच संवेदनशील ठाणे असताना अपुरे कर्मचारी आहे. त्यातच पोलीस दलात सिंघम म्हणून ओळखले जाणारे अनिलसिंह गौतम यांच्यानंतर त्यांनी पदभार सांभाळला. त्यामुळे सामान्य जनतेच्या अपेक्षांचे ओझे त्यांच्यावर होते. परंतु त्यांनी आपल्या कार्यशैलीची चुणूक दाखवित कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात यश मिळविले.सर्वप्रथम त्यांनी दारू विरोधी मोहीम उघडली. अल्पावधीत त्यांनी ११७ केसेस दाखल करून साडेतीन लाखांच्यावर मुद्देमाल जप्त केला. जुगार अड्ड्यावर धाडी मारुन ३१ जणांवर कारवाई केली. मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. चार महिन्याच्या कालावधीत शहरात एखादा अपवाद वगळता कुठेही चोरी झाली नाही. शहरासोबतच ग्रामीण भागातही त्यांनी आपला वचक निर्माण केला. शिवजयंती, रामनवमी, मुंगसाजी महाराज पुण्यतिथी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी शांततेत पार पडल्या. ही ठाणेदार रिता उईके यांच्या यशस्वी कारकीर्दीची पावतीच होय. गुन्हेगारांना शिक्षा आणि सामान्यांना न्याय मिळवून देण्याचा त्या प्रयत्न करतात.दारव्हा शहराची संवेदनशील म्हणून असलेली ओळख पुसण्यासाठी ठाणेदार रिता उईके प्रयत्न करीत आहेत. त्यांना नागरिकांचेही सहकार्य लाभत आहेत.

नागरिकांच्या अपेक्षादारव्हा शहर तसेच ग्रामीण भागात गुन्हेगारी प्रवृत्तीवर त्यांनी वचक निर्माण केला. परंतु ग्रामीण भागातील दारू, मटका, जुगार आजही छुप्या पद्धतीने काही प्रमाणात सुरू आहे. त्यांच्यावरही कारवाई व्हावी. दारव्हा तालुका दारूमुक्त व्हावा, अशी अपेक्षा आहे. तसेच शहरातील चिडीमारी बंद करून महिला व विद्यार्थिनींना सुरक्षितता वाटावी, असे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. तसेच शहरातील वाहतूक व्यवस्थाही सुरळीत करण्याची अपेक्षा नागरिकांची आहे.

वरिष्ठांचे पाठबळ, सहकाऱ्यांची साथदारव्हा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आहे. येथे डॉ. नीलेश पांडे सक्षम अधिकारी कार्यरत आहे. त्यांचे रिता उईके यांना वेळोवेळी पाठबळ मिळते. सहकारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पेठे, पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे, वाहतूक शाखेचे प्रमुख तारासिंग जाधव, संतोष माने, संदीप मुपडे यांच्यासह रायटर कैलास लोथे व इतर कर्मचाऱ्यांची त्यांना मिळणारी साथ महत्वाची आहे.

टॅग्स :Policeपोलिस