रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतीचा वाढता खर्च नियंत्रित करण्यासोबतच जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी रासायनिक खतांवर सबसिडी देण्यात येते. ही सबसिडी कोट्यवधींच्या घरात आहे. असे असतानाही खताच्या किंमती मात्र यावर्षी टनामागे अडीच हजाराने वाढल्या आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होऊन नफा घटणार आहे. याचा जबर फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.खत विक्री करताना कंपन्या शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधींची सबसिडी लाटतात. त्यामुळे खत विक्रीसाठी पॉस मशीनचा प्रयोग राबविण्यात आला आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी रासायनिक खताची खरेदी केल्यानंतरच खतावरील अनुदान कंपनीला मिळणार आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांच्या सबसिडी चोरीला आळा बसण्यास मदत झाली. तर दुसरीकडे कंपन्यांनी फॉस्पेटचे दर वाढल्याने खताच्या किंमती परवडणाऱ्या नसल्याचे कारण सांगत दर वाढविले आहे. यामुळे शेतकऱ्यांना खतासाठी यंदाच्या हंगामात अधिक पैसे मोजावे लागणार आहे.शेतमालाचे दर जैसे थे आहे. इतकेच नव्हे तर काही धान्यांच्या किंमती खाली घसरल्या आहे. बियाणे, खत, मजुरी आणि विजेचे दर वाढत असताना शेतमालाच्या किंमती कमी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात अल्प पैसे येत आहे. ही कृषी क्षेत्रासाठी चिंतेची बाब मानली जाते. आता येणाऱ्या हंगामात खताची बुकींग करताना सुधारित किंमती जाहीर केल्या आहे. यामध्ये काही प्रमुख खतांवर ५० किलोला २०० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. इतर खतांच्या पोत्यांवर १०० रुपयांनी वाढ जाहीर करण्यात आली आहे. कॉम्पलेक्स खताच्या किंमती टनाला १६०० रुपयाने वाढले आहे. तर डीएपीच्या किंमतीत टनामागे दोन हजार ५०० रुपये वाढ झाली आहे. मिश्र खताच्या शासकीय कारखान्यात सध्या शुकशुकाट पहावयास मिळत आहे. तर खासगी कंपनीधारक मिश्र खतांच्या निर्मितीसाठी सज्ज आहेत. या ठिकाणी तपासणी होण्याची गरज आहे. कंपन्यांचे डिलर जीएसटीमुळे फॉस्पेटच्या किंमती वाढल्याचे सांगत आहे. त्यातूनच खताचे दर वाढल्याचे गणित मांडले जात आहे.
रासायनिक खतांच्या किमती भडकल्या; टनामागे अडीच हजारांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 1:27 PM
रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतीचा वाढता खर्च नियंत्रित करण्यासोबतच जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी रासायनिक खतांवर सबसिडी देण्यात येते. ही सबसिडी कोट्यवधींच्या घरात आहे. असे असतानाही खताच्या किंमती मात्र यावर्षी टनामागे अडीच हजाराने वाढल्या आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होऊन नफा घटणार आहे. याचा जबर फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.खत ...
ठळक मुद्देशेतकऱ्यांना हादरापॉसचा उतारा की महागाई केंद्र शासनाने खतावरील सबसिडी नियंत्रणासाठी पॉस मशीनचा प्रयोग सुरू केला आहे. त्यामुळे खताचा संपूर्ण व्यवहार आॅनलाईन झाला आहे. यातून कंपन्यांची अनुदानित सबसिडी मर्यादित झाली. बोगस प्रकाराला चाप लागला आहे. त्यामुळे कंपन्यांनी आपला नफा