शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
3
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
4
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
5
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
6
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
7
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
8
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
9
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
10
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
11
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
12
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
13
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
14
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
15
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
16
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
17
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
18
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
19
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
20
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा

पन्नाशी पार शेतमजुरांनी दिली तीन तासांची परीक्षा, साक्षरतेचे मिळणार प्रमाणपत्र

By अविनाश साबापुरे | Published: March 17, 2024 7:28 PM

प्रौढ निरक्षरांसह शिक्षकांच्याही चेहऱ्यावर उमटली समाधानाची लकेर

यवतमाळ: अर्धे वय उलटून गेले... शेतमजुरी करता-करता पाटीपुस्तकाशी नातेच तुटले... पण एवढे दिवस अज्ञानाचा अंध:कार सोसल्यानंतरही मनात शिकण्याची उर्मी कायमच होती... नेमकी हीच उर्मी घेऊन रविवारी हजारो बाया-बापड्यांनी शाळेत हजेरी लावली अन् तीन तास एकाच जागी स्थिर बसून परीक्षा दिली. पन्नाशी पार पोहोचलेल्या प्रौढ असाक्षरांनी परीक्षेतून आनंद मिळविल्याचे पाहून रविवारी शिक्षकांच्याही चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटली.

नव भारत साक्षरता अभियाना अंतर्गत नोंदणी झालेल्या प्रौढ निरक्षरांची रविवारी राज्यभरात परीक्षा घेण्यात आली. केंद्र सरकारने योजना शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून ही परीक्षा आयोजित केली होती. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत केव्हाही या अन् परीक्षा द्या, अशी मुभा देण्यात आली होती. त्यामुळे अनेक खेड्यातले नोंदणीकृत निरक्षर सकाळीच वावरात गेले. दुपारी जेवण आटोपून परीक्षेला आले. परीक्षा केंद्रावरील केंद्र संचालक व अन्य शिक्षक मात्र सकाळी ९ वाजतापासूनच शाळेत त्यांची वाट पाहात होते. दुपारी परीक्षार्थी आल्यावर पेपर सुरू झाला अन् शिक्षकही चकीत झाले. कारण ज्यांना आपण अडाणी समजतो, ते प्रौढ परीक्षार्थी अगदी मन लावून, मग्न होऊन तीन तास प्रश्नपत्रिका सोडविताना दिसून आले. आता या परीक्षेत एकंदर १५० पैकी ५१ म्हणजेच किमान ३३ टक्के गुण घेणाऱ्या निरक्षर प्रौढांना साक्षर झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

दोन वाजता आले तीन जण!यवतमाळ जिल्ह्यातील ताडसावळी येथील जिल्हा परिषद शाळेतून तीन प्रौढ निरक्षरांची नोंद झाली होती. ५७ वर्षांचे कर्णू श्यामराव कुडमते, ५२ वर्षांच्या सीताबाई कर्णू कुडमते आणि ४७ वर्षांच्या सुरेखा दत्ता मोगरे अशी या परीक्षार्थ्यांची नावे आहेत. त्यांची परीक्षा घेण्यासाठी ताडसावळी केंद्रावर चार शिक्षक सकाळपासूनच परीक्षा साहित्य घेऊन, बाकावर आसन क्रमांक टाकून सज्ज होते. परंतु, तीनही परीक्षार्थी आपली दैनंदिन कामे आटोपून दुपारी दोन वाजता शाळेत आले.

कारागृहातही परीक्षेची सोय... घरातूनही पेपर ! ज्या जिल्ह्यात कारागृहातील प्रौढ व्यक्तीची उल्लास ॲपवर नोंदणी झालेली आहे, त्याच्यासाठी कारागृह प्रमुखामार्फत माहिती घेऊन कारागृहातच परीक्षा केंद्र देण्याची सूचना योजना शिक्षण संचालक डाॅ. महेश पालकर यांनी केली होती. तर शरीरिकदृष्ट्या अक्षम, दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तींसाठी त्याच्या घरी किंवा दवाखान्यातच पेपर सोडविण्याची व्यवस्था करण्याबाबतही सूचना देण्यात आली होती. परंतु, यवतमाळ जिल्ह्यात अशी नोंदणी नसल्याचे शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ