शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

बेंबळाच्या विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 10:25 PM

बेंबळा प्रकल्पातील पाणी यवतमाळात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असून, येथील टाकळी सम्प आणि जॅकवेल जवळच्या पंपहाऊसला विद्युत पुरवठ्याचे काम पूर्ण झाले आहे. येथील मशनरी लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे.

ठळक मुद्देटँँकरचे नव्याने नियोजन : दैनंदिन फेऱ्या वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची योजना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बेंबळा प्रकल्पातील पाणी यवतमाळात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असून, येथील टाकळी सम्प आणि जॅकवेल जवळच्या पंपहाऊसला विद्युत पुरवठ्याचे काम पूर्ण झाले आहे. येथील मशनरी लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे. याशिवााय जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पाणीपुरवठा टॅँकरचे फेरनियोजन केले आहे. दिवसात अधिक फेऱ्या होण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.बेंबळाचे पाणी जूनच्या पहिल्या आठवड्यात पोहोचण्याचा विश्वास यंत्रणेकडून व्यक्त केला जात आहे. पिण्यायोग्य पाणी नसले तरी, दैनंदिन वापराकरिता पाणी आणण्याच्या कामाचा शेवटचा टप्पा सुरू आहे. टाकळी सम्प येथे मशीनरी आली असून जीवन प्राधिकरणच्या इलेक्ट्रीक विंगकडून काम सुरू आहे. त्यासाठी लागणारी केबली पोहोचली आहे. शिवाय यवतमाळ शहरात येणाऱ्या पाईपलाईनचेही काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. ट्रायलमध्ये कोणता अडथळा न आल्यास दहा ते बारा दिवसात पाणी पोहोचविण्याची तयारी केली जात आहे. टाकळी सम्पच्या टाकीचे काम पूर्ण करण्याऐवजी तेथून थेट सम्पमधून पुरवठा सुरू करण्याच्या हालचाली केल्या जात आहे. टंचाईमुळे त्रस्त यवतमाळकरांचा दबाव यंत्रणेवर असल्याने कामाची गती वाढली आहे. त्यामुळे एकदा ट्रायल पूर्ण करून जीवन प्राधिकरण कार्यालयातील सम्पमध्ये पाणी पाहोचविले जाणार आहे. शहरातील अंतर्गत पाईपलाईनचेही काम शेवटच्या टप्प्यात असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.शहरातील टंचाई निवारणासाठी टॅँकरच एकमेव पर्याय आहे. गोखीच्या एमआयडीसी पॉर्इंटवर टॅँकरची प्रचंड गर्दी होती. त्यामुळे प्रभागात टॅँकरच्या कमी फेऱ्या होत होत्या. हा गुंता सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शहरात पाच पॉर्इंट तयार केले आहे. तेथून मोठ्या टॅँकरने पाणी पुरविण्याचे नियोजन आहे. पालिकेच्या ६१ टँकरने दिवसभरात ३२० फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. अंतर कमी झाल्याने फेऱ्या वाढल्या असून काटेकोरपणे प्रत्येक घरी किमान पाणी देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Bembla Damबेंबळा धरण