लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सहायक पोलीस उपनिरीक्षकाच्या खुनातील आरोपीचा आठवडाभर २१०० किलोमीटरचे जंगल पालथे घालूनही शोध न लागल्याने अखेर मारेगावच्या जंगलातील सुमारे २०० पोलिसांची फौज हटविण्यात आली. मात्र आरोपीचा शोध सुरू राहणार असून त्याच्या गावावर वॉचही ठेवला जाणार आहे.मारेगाव पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कुडमेथे (रा. वणी) यांचा फरार आरोपीच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. या आरोपीचा शोध घेण्यासाठी २०० वर पोलिसांची फौज तैनात करण्यात आली होती. मात्र गेल्या आठवडाभरात त्याचा शोध लागला नाही. तो जंगलातच लपून असावा व त्याचा पोलिसांवर वॉच असावा, असा कयास आहे. म्हणून जंगलातील पोलिसांची फौज सोमवारपासून हटविण्यात आली. जंगलात पोलीस नाहीत याची खात्री पटल्यानंतर तो गावात येईल असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस फौज हटली असली तरी मारेगाव पोलिसांचा आरोपी अनिल मेश्रामच्या हिवरी गावावर कायमच वॉच राहणार आहे. त्यासाठी साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात आल्याचे सांगितले जाते. पोलिसाच्या खुनातील आरोपीच आठ-आठ दिवस सापडत नसेल तर सामान्यांचे काय? असा प्रश्न वणी विभागात जनतेतून उपस्थित केला जात आहे.आरोपीची अजब हिस्ट्री : म्हणे, नागपूरपर्यंतचे पोलीस ठाणे उडविणारपोलीस सूत्रानुसार, २०११-१२ मध्ये अनिलवर मारेगाव पोलीस ठाण्यात भादंवि ३२४, ३५४ कलमान्वये गुन्हा नोंदविला गेला होता. त्यावेळी त्याला अटक केली गेली. अटकेदरम्यान मिळालेल्या ट्रीटमेंटमुळे त्याचा पोलिसांवर राग होता. आता मारेगावपासून नागपूरपर्यंतचे सर्व पोलीस ठाणे मी उडवितो, असे बोलून तो आपला पोलिसांवरील राग व्यक्त करीत होता. त्यासाठी तो ब्लास्टचे चित्रपटही पहायचा. मोठ्या आवाजात बोलणे, शिवीगाळ करणे त्याला आवडायचे नाही. याच कारणावरून त्याने वडिलांवरही कुºहाडीने हल्ला केला होता. लाठ्याकाठ्या फिरविण्यात तो पटाईत असल्याचे सांगितले जाते. न्यायालयातून वारंवार वॉरंट येऊनही पोलिसांकडून त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याचा ठपका न्यायालयाने ठेवल्यामुळे मारेगाव ठाणेदारांनी अनिल हिवरी गावात असल्याची टीप मिळताच त्याच रात्री आपले पोलिसांचे पथक रवाना केले. चालकासह पाच पोलीस कर्मचारी शासकीय वाहन घेऊन आरोपीच्या अटकेसाठी हिवरी गावात गेले. आरोपीचे वर्तन माहीत असतानाही या पोलीस पथकाने कोणतीच सावधगिरी बाळगली नाही. त्यांच्याकडे शस्त्रे तर सोडा साधी काठीही नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अनिलने हल्ला करताच या पोलिसांपुढे बचावासाठी काहीच नव्हते. अखेर त्यातच सहायक पोलीस उपनिरीक्षकाला आपला जीव गमवावा लागला. अविवाहित असलेला अनिल आपल्या गाई-म्हशी व गावातील जनावरे चारायला न्यायचा. त्यातून मिळणाऱ्या पैशातच तो गुजरान करायचा. त्याच्याकडे बोकड होता. त्याला १४ हजाराचा खरेदीदार मिळाला. मात्र आपला बोकड आपण एक लाखात विकू असे तो गावकºयांना सांगायचा. यावरून त्याचे वागणे-बोलणे व एकूणच वर्तवणुकीचा अंदाज येतो.
अखेर मारेगावच्या जंगलातून २०० पोलिसांची फौज मागे घेतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 9:34 PM
सहायक पोलीस उपनिरीक्षकाच्या खुनातील आरोपीचा आठवडाभर २१०० किलोमीटरचे जंगल पालथे घालूनही शोध न लागल्याने अखेर मारेगावच्या जंगलातील सुमारे २०० पोलिसांची फौज हटविण्यात आली. मात्र आरोपीचा शोध सुरू राहणार असून त्याच्या गावावर वॉचही ठेवला जाणार आहे.
ठळक मुद्देसहायक फौजदाराचे खूनप्रकरण : मारेकरी अनिलचा शोध सुरूच, घरावर वॉच