लोकमत न्यूज नेटवर्कवणी : बेदरकारपणे दुचाकी हाकणाऱ्या युवकाला हटकले म्हणून त्या युवकाने मागाहून येऊन धडक दिली. यात रुपाली प्रमोद वासेकर ही महिला गंभीर जखमी झाली. या घटनेची गंभीर दखल आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी घेतली. वणी शहरात धुमाकूळ घालणाऱ्या दुचाकीस्वार युवकांच्या मुसक्या आवळा, असे निर्देशच त्यांनी शुक्रवारी वणीच्या वाहतूक पोलिसांना दिले.दरम्यान, गुरूवारपासून वाहतूक पोलिसांनी धूम स्टाईल बाईकस्वारांची धरपकड सुरू केली असून शुक्रवारी दिवसभर मोहिम राबवून ५० पेक्षा अधिक दुचाकीस्वारांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. ही मोहिम आता दर दोन दिवसांनी सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे वाहतूक निरीक्षक संग्राम ताठे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.धूम स्टाईल बाईकस्वाराच्या उद्दामपणाने रुपाली वासेकर ही महिला गंभीर जखमी झाल्यानंतर पोलिसांनी धूम स्टाईल दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई सुरू केली. मात्र या कारवाईदरम्यान, काहींनी मर्जीतील वाहनचालकांना सोडण्याबाबत पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी दबावाला न जुमानता कारवाई सुरूच ठेवली.रुपालीवर शस्त्रक्रियाधूम स्टाईल दुचाकीस्वाराने जाणीवपूर्वक धडक दिल्याने रुपाली वासेकर या महिलेच्या डोक्याला जबर दुखापत झाली. तातडीने नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेपासून ती बेशुद्धावस्थेतच आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी अचानक रक्तस्त्राव वाढल्यान डॉक्टरांनी तिच्यावर तातडीने शस्त्रक्रीया केली.
अखेर धूम स्टाईल बाईकर्सची धरपकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:19 PM
बेदरकारपणे दुचाकी हाकणाºया युवकाला हटकले म्हणून त्या युवकाने मागाहून येऊन धडक दिली. यात रुपाली प्रमोद वासेकर ही महिला गंभीर जखमी झाली. या घटनेची गंभीर दखल आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी घेतली.
ठळक मुद्देआमदारांचे निर्देश : धुमाकूळ घालणाºया युवकांच्या मुसक्या आवळा