शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

अखेर ‘त्या’ पोस्टमन विरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 10:22 PM

लोहारा परिसरातील ग्रामस्थांनी २०१३ ते २०१५ या वर्षात काढलेले आधारकार्ड पोस्टाने त्यांच्या घरी पोहोचलेच नाही. या घटनेचे बिंग २०१८ मध्ये रविवारी फुटले.

ठळक मुद्देआधारकार्ड : डाक विभागाला थांगपत्ता नाही

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : लोहारा परिसरातील ग्रामस्थांनी २०१३ ते २०१५ या वर्षात काढलेले आधारकार्ड पोस्टाने त्यांच्या घरी पोहोचलेच नाही. या घटनेचे बिंग २०१८ मध्ये रविवारी फुटले. साई मंदिर परिसरात गाळ काढताना विहिरीत तब्बल १५२ आधारकार्ड असलेली कॅरीबॅगच सापडली. आता या प्रकरणी अज्ञात पोस्टमन विरोधात अवधूतवाडी पोलीस ठाण्यात नायब तहसीलदाराच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.आधारकार्ड बेवारस स्थितीत मिळाल्याच्या घटनेची जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दखल घेत तहसीलदार सचिन शेजाळ यांना चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणात नायब तहसीलदार शिल्पा नगराळे यांच्या तक्रारीवरून डाक विभागातील अज्ञात पोस्टमनविरोधात भादंवि ४०९ नुसार अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डाक विभागातून वाटपासाठी गेलेले आधारकार्ड परस्परच फेकून देण्यात आले. या गंभीर प्रकरणाची अद्यापपर्यंत डाक विभागाने दखल घेतली नाही. याबाबत कार्यालयीन चौकशी करून त्या काळात लोहारा परिसरासाठी कोण पोस्टमन कार्यरत होता त्याच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते. आता प्रकरण पोलिसांकडे गेल्याने सर्वच जण अडचणीत येण्याची शक्यता आहे.डाक विभागाच्या अनियंत्रित कारभाराचा हा धडधडीत पुरावा हाती लागला आहे. यवतमाळच्या डाक विभागाचे अधिनस्थ कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने अनेक गंभीर प्रकरणे येथे घडत आहे. यापूर्वीही थेट हरियाणा येथून घातक शस्त्रे कुरिअरद्वारे एका युवकाने बोलाविली होती. या प्रकरणातही पोलीस चौकशी झाली. मात्र कार्यालयातून आपल्या कर्मचाऱ्यांना अभय देण्याचे काम करण्यात आले. आताही आधारकार्डाचे गंभीर प्रकरण बाहेर आले असताना ठोस कारवाई झालेली दिसत नाही.संशयाच्या भोवऱ्यातडाक विभागाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात आला आहे. विविध शासकीय दस्ताऐवज नव्या नियमाप्रमाणे थेट डाक विभागाच्या माध्यमातून घरापर्यंत पाठविले जातात. वाहनांचे आरसी बुक, परवाना व इतरही महत्त्वाचे दस्तऐवज अशा पद्धतीने बाहेर फेकले जात असेल तर संशय व्यक्त होत आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड