लोकमत इम्पॅक्ट
फोटो
पुसद : येथील महात्मा ज्योतिबा फुले याच्या पुतळ्याभावेती अतिक्रमणासह घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. याबाबबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच पालिकेला जाग आली. त्यानंतर, अतिक्रमण हटविण्यात आले आहे.
नगरपरिषेदेने शुक्रवारी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोरील अतिक्रमण हटविले आहे. स्थानिक महात्मा फुले चौकातील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील मागील अनेक दिवसांपासून असलेले अतिक्रमण पालिकेच्या वतीने शुक्रवारी हटविण्यात आले. पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी सामाजिक कार्यकर्ते समीर गवळी यांनी लगेच तात्पुरत्या स्वरूपाची बॅरिकेटिंग करून घेतली. या संदर्भात ‘लोकमत’ने ८ एप्रिलच्या अंकात ‘पुसदमध्ये पुतळ्याभोवती घाणीचे साम्राज्य, अतिक्रमणाचाही विळखा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते, हे विशेष.
मुख्यधिकारी डॉ.किरण सुकलवाड यांनी सर्व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आपण कायमस्वरूपी कटघरे, तसेच पुतळ्यासमोरील भागात सुशोभीकरण लवकरच करून देऊ, असे यावेळी सांगितले. नगराध्यक्ष अनिताताई नाईक यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष डॉ.अकिल मेमन, आरोग्य सभापती ॲड. भारत जाधव, नगरसेवक तथा माजी उपाध्यक्ष डॉ.मोहम्मद नदीम, संजय चव्हाण, विद्युत सभापती इंदुबाई शिवाजीराव गवळी, पुतळा सभापती रेखाताई संजयसिंह चव्हाण, प्रशांत देशमुख, गणेश डंगोरिया, मुख्याधिकारी डॉ.किरण सुकलवाड, शहरच्या ठाणेदारांनी अतिक्रमण हटविण्यासाठी पुढाकार घेतला.
बॉक्स
माळी समाजाने मानले आभार
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याभोवती अतिक्रमणाने विळखा घातला होता. त्यामुळे अखिल भारतीय माळी महासंघाने तीव्र संताप व्यक्त केला होता. वारंवार निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. ११ एप्रिल रोजी धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. आता अतिक्रमण हटविण्यात आल्याने माळी समाजाने नगरपरिषदेचे आभार मानत आंदोलन स्थगित केले आहे.