शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

पहिलीचे विद्यार्थी शोधताना प्रौढ निरक्षरही शोधा, नव्या वर्षाचा टास्क

By अविनाश साबापुरे | Updated: May 12, 2024 16:12 IST

देशात २०२२ पासून सुरू झालेले नवभारत साक्षरता अभियान महाराष्ट्रात २०२३-२४ या वर्षात सुरू झाले. पहिल्या वर्षी एकंदर १२ लाख ४० हजार निरक्षरांची नोंदणी करून परीक्षा घेण्याचे उद्दिष्ट केंद्राकडून देण्यात आले होते.

यवतमाळ : प्रौढ असाक्षरांची पहिली परीक्षा आटोपून सव्वाचार लाख लोक साक्षर झाले. आता २०२४-२५ या नव्या वर्षासाठी राज्यभरातील शिक्षकांना निरक्षर नोंदणीचे नवे टार्गेट ठरवून देण्यात आले आहे. त्यानुसार ५ लाख ७३ हजार ३३७ प्रौढ निरक्षरांची नोंदणी करायची आहे. तसेच जुन्या वर्षातील उर्वरित निरक्षरांसह एकंदर ८ लाख ४ हजार ९९ प्रौढांची यंदा परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे आता मे महिन्यात गुरुजींनी पहिल्या वर्गाचे विद्यार्थी शोधत असतानाच प्रौढ निरक्षरांची नोंदणीही सुरू करण्याचे निर्देश योजना शिक्षण संचालनालयाने दिले आहेत.

देशात २०२२ पासून सुरू झालेले नवभारत साक्षरता अभियान महाराष्ट्रात २०२३-२४ या वर्षात सुरू झाले. पहिल्या वर्षी एकंदर १२ लाख ४० हजार निरक्षरांची नोंदणी करून परीक्षा घेण्याचे उद्दिष्ट केंद्राकडून देण्यात आले होते. परंतु, ६ लाख ४१ हजार ८१६ निरक्षरांचीच उल्लास ॲपवर नोंदणी होऊ शकली, तर ४ लाख ५९ हजार ५३३ जणांनी १७ मार्च रोजी परीक्षा दिली. त्यातून ४ लाख २५ हजार ९०६ प्रौढ साक्षर म्हणून उत्तीर्ण झाले.

हे अभियान २०२७ पर्यंत चालणार असून, दरवर्षी नोंदणी व परीक्षार्थींचे टार्गेट ठरवून देण्यात येत आहे. परंतु, महाराष्ट्रातील मागील वर्षाचा अनुभव पाहता २०२४-२५ या वर्षासाठी नवे टार्गेट न देता जुन्या १२ लाख ४० हजारांपैकी उर्वरित असाक्षरांचीच नोंदणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार, यंदा ५ लाख ७३ हजार ३३७ असाक्षरांची नोंदणी करणे आवश्यक आहे, तर मागील वर्षी परीक्षेला बसू न शकलेले, उत्तीर्ण होऊ न शकलेले असे असाक्षर मिळून एकंदर ८ लाख ४ हजार ९९ असाक्षरांची परीक्षा घेतली जाणार आहे. याबाबत शिक्षण संचालक डाॅ. महेश पालकर यांनी सर्व जिल्हानिहाय उद्दिष्ट देऊन नोंदणीचे निर्देश दिले आहेत.

प्रौढ साक्षरतेचा जिल्हानिहाय आढावा सुरूनव भारत साक्षरता अभियानाची नवीन वर्षात प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी योजना शिक्षण संचालक डाॅ. महेश पालकर यांनी दि. ९ मेपासून जिल्हानिहाय आढावा सुरू केला. पहिल्या दिवशी अमरावती विभागातील यवतमाळ, अकोला, बुलडाणा, अमरावती, वाशिम जिल्ह्यांचा आढावा व्हीसीद्वारे घेण्यात आला, तर १० मे रोजी नागपूर विभागाचा आढावा घेतला. आता १४ मे रोजी कोल्हापूर, १५ मे रोजी पुणे, १६ मे रोजी लातूर, १७ मे रोजी छत्रपती संभाजीनगर, २२ मे रोजी आणि २४ मे रोजी मुंबई विभागातील जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार आहे. यामध्ये शिक्षणाधिकारी, डायट प्राचार्यांसह अगदी तालुका व केंद्र स्तरावरच्या कर्मचाऱ्यांना सामील करून माहिती घेण्यात येत आहे.

नव्या वर्षात अशी असेल साक्षरता मोहीम

जिल्हा : असाक्षर नोंदवा : परीक्षेला बसवा

- विदर्भ :अकोला : ५,८४५ : १३,२२३अमरावती : ७,६८७ : १४,७५८भंडारा : ६,१२३ : ७,०३०बुलडाणा : ९,५८८ : १४,२११चंद्रपूर : ८,३०९ : २३,५१५गडचिरोली : १७४३ : ३१,७०७गोंदिया : ६,५४७ : ७,८८९नागपूर : १७,४८४ : २३,३२५वर्धा : ८,८१५ : ९,४३९वाशिम : ७,१६६ : १८,९७२यवतमाळ : १२,४०३ : १७,१२२

- मराठवाडा :छ. संभाजीनगर : २४,३१५ : २६,९२१हिंगेाली : ६,९२७ : १०,४२८जालना : १६,५७७ : २१,१६२लातूर : १७,५६३ : १९,२७२नांदेड : २४,५७३ : २८,६२९धाराशिव : १३,३७५ : १५,२३७परभणी : १३,९११ : २०,३७४बीड : २०,४२५ : २१,२८१

- पश्चिम महाराष्ट्र :कोल्हापूर : २३,७१० : २४,२९२पुणे : ३८,३०८ : ४१,९४४सांगली : १५,१५५ : १५,८९५सातारा : १६,२५५ : १८,०५०सोलापूर : २९,७९७ : ३५,२५०अहमदनगर : २८,६३५ : ३४,६२४

- कोकण :रायगड : १२,१०८ : १५,३२९रत्नागिरी : ९,३३७ : १२,०९४मुंबई शहर : ११,९११ : १५,१२७मुंबई उपनगर : ३०,४६१ : ३५,६८४सिंधुदुर्ग : ४,४१५ : ४,४९६ठाणे : २१,६५७ : ३३,२३७पालघर : २९,१२४ : ३३,६९१

- उत्तर महाराष्ट्र :नंदूरबार : १४,६८१ : ३१,५०३नाशिक : २९,७२४ : ४०,००७धुळे : १६,८५६ : १७,५३२जळगाव : १५,८२७ : ५०,८४९महाराष्ट्र एकूण : ५,७७,३३७ : ८,०४,०९९

टॅग्स :YavatmalयवतमाळEducationशिक्षण