शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
6
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
7
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
8
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
9
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
10
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
11
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
12
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
13
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
14
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
15
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
16
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
17
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
18
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
19
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
20
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला

आगीत २५ क्विंटल ओवा पीक भस्मसात

By admin | Published: May 07, 2017 12:53 AM

परंपरागत पिकांना फाटा देत आपल्या शेतात पिकविलेला २५ क्विंटल ओवा शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत जळून भस्मसात झाला.

अडीच लाखांचे नुकसान : दिग्रसच्या लायगव्हाणची घटना लोकमत न्यूज नेटवर्क दिग्रस : परंपरागत पिकांना फाटा देत आपल्या शेतात पिकविलेला २५ क्विंटल ओवा शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत जळून भस्मसात झाला. यात दोन लाखांच्या ओव्यासह थ्रेशर मशीनही जळून खाक झाली. ही घटना तालुक्यातील लायगव्हाण येथे शनिवारी दुपारी ३ वाजता घडली. दिग्रस तालुक्यातील मांडवा येथील शेतकरी गजानन राघोजी क्षीरसागर यांनी यंदा आपल्या शेतात ओव्याचे पीक घेतले. पिकाची पूर्ण वाढ झाल्यानंतर कापलेल्या ओव्याच्या झाडाचे मोठे दोन ढीग लावले. ओवा काढण्यासाठी थ्रेशर मशीनही आणण्यात आले. सकाळी काही प्रमाणात ओवा काढण्यात आला. त्यानंतर गजानन क्षीरसागर भोजनासाठी दुपारी २ वाजता घरी गेले. त्यावेळी शेतातून जाणाऱ्या वीज तारांमध्ये शॉर्टसर्किट होवून त्याच्या ठिणग्या ओव्याच्या गंजीवर पडल्या. काही क्षणातच संपूर्ण ओवा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. सुमारे २५ क्विंटल ओवा या आगीत जळाल्याची माहिती आहे. सोबतच ओवा काढणीस आणलेले थ्रेशर, ताडपत्री, ठिबक नळ्या जळून खाक झाल्या. विशेष म्हणजे, दिग्रस कृषी विभागांतर्गत आत्मा मॉडेलनुसार या शेतात मसाले पीक प्रात्यक्षिक घेण्यात येत होते.