लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सर्वोच्च न्यायालयाने दिवाळी सण साजरा करताना आतषबाजीवर निर्बंध घातले आहे. रात्री ८ ते १० या वेळेत फटाके फोडण्याची मुभा दिली आहे. शिवाय फटाक्यांच्या आवाजावरही डेसिबलची मार्यादा घातली आहे. दिवाळी उत्सव साजरा करताना फटाके जरूर फोडा, मात्र नियमात राहून, अन्यथा कारवाई होणार, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी केले आहे.दिवाळीच्या उत्सवादरम्यान पोलीस पेट्रोलिंग कायम आहे. या माध्यमातून आतषबाजीवरही वॉच राहणार आहे. एकाच वेळी सर्वत्र आतषबाजी होत असल्याने पर्यावरणाची मोठी हानी होते. शिवाय फटक्याच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनीप्रदूषण होते. याचा अनेकांना त्रास सहन करावा लागतो.रुग्णालय, शैक्षणिक संस्थांचा परिसर तसेच ज्या भागात ‘सायलेंट झोन’ आहे. अशा ठिकाणी फटके फोडण्यावर बंदी आहे. इतकेच नव्हेतर फटाके विक्री करणाऱ्यांनाही सुरक्षिततेच्या दृष्टीने काही नियम घालून दिले आहेत. नियमांच्या अधीन राहूनच विक्री करावी, असे निर्देश दिले आहेत. सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी केले आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी आतषबाजीचा आनंद जपूनच करण्याची गरज आहे.
फटाके फोडा, पण नियमात राहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 9:22 PM
सर्वोच्च न्यायालयाने दिवाळी सण साजरा करताना आतषबाजीवर निर्बंध घातले आहे. रात्री ८ ते १० या वेळेत फटाके फोडण्याची मुभा दिली आहे. शिवाय फटाक्यांच्या आवाजावरही डेसिबलची मार्यादा घातली आहे. दिवाळी उत्सव साजरा करताना फटाके जरूर फोडा, मात्र नियमात राहून, अन्यथा कारवाई होणार, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी केले आहे.
ठळक मुद्देजिल्हा पोलीस अधीक्षकांचे आवाहन : आतषबाजीवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांची गस्त