लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : येथील स्टेट बँकेसमोरील एका ईलेक्ट्रॉनिक दुकानाला आग लागली. ही घटना सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या आगीत लाखोचे साहित्य भस्मसात झाले. दुकानमालक गंभीर जखमी झाले.स्टेट बँकेसमोरील मुख्य रोडवर बालाजी रेगुलवार यांच्या कॉम्प्लेक्समध्ये प्रथमेश ईलेक्ट्रीक नावाचे दुकान आहे. या दुकानाला सोमवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आग विझविण्याच्या प्रयत्नात दुकानमालक लक्ष्मण महादेव टेकाळे गंभीर जखमी झाले. आगीत दुकानातील पीव्हीसी पाईप व इतर साहित्य भस्मसात झाले. या आगीत लाखोंचे नुकसान झाले. जखमी लक्ष्मण टेकाळे यांना प्रथम येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. नंतर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या दुकानापासून अवघ्या १०० फूट अंतरावर नगरपरिषद कार्यालय आहे. मात्र आग लागल्यानंतर तब्बल एक तासाने नगरपरिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत दुकानातील लाखोंचे साहित्य जळून खाक झाले होते. नगरपरिषदेचे अग्निशमन दल कुचकामी ठरल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
दिग्रसमध्ये ईलेक्ट्रॉनिक दुकानाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 10:35 PM
येथील स्टेट बँकेसमोरील एका ईलेक्ट्रॉनिक दुकानाला आग लागली. ही घटना सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या आगीत लाखोचे साहित्य भस्मसात झाले. दुकानमालक गंभीर जखमी झाले. स्टेट बँकेसमोरील मुख्य रोडवर बालाजी रेगुलवार यांच्या कॉम्प्लेक्समध्ये प्रथमेश ईलेक्ट्रीक नावाचे दुकान आहे.
ठळक मुद्देलाखोंचे नुकसान : दुकान मालक गंभीर जखमी, अग्निशमन दलाला एक तास विलंब