लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : येथील शास्त्रीनगरात आगीत संपूर्ण घर भस्मसात झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. त्यात दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. या घरात झोपलेले १६ वऱ्हाडी लहान मुलीच्या सतर्कतेने सुदैवाने बचावले.येथील शास्त्रीनगरात शेख इम्रान शेख शब्बीर यांचे घर आहे. शनिवारी पहाटे ३ वाजता सर्वजण गाढ झोपेत असताना अचानक आग लागली. या आगीत लाकडी पडप्यांचे घर जळायला लागले. काही वेळातच संपूर्ण घर भस्मसात झाले. घरातील कपडे, दागिने, अन्नधान्य, टीव्ही भस्मसात झाले. आगीने शेजारच्या घरांचेही नुकसान झाले. आगीची माहिती होताच बांधकाम सभापती अन्वर पठाण यांनी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणली.विशेष म्हणजे, शेजारील घरी लग्न होते. या घरातील वऱ्हाडी घरात झोपून होते. पहाटे तीन वाजता एका मुलीला तहान लागल्याने ती उठली. तेव्हा तिला आग लागल्याचे दिसले. तिने आरडाओरड केल्याने गाढ झोपेतील सर्वजण जागे झाले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.सदर आग घरावरून गेलेल्या तारांमध्ये घर्षण होवून ठिणगी पडल्याने झाल्याचे सांगण्यात आले. मोलमजुरी करणारे कुटुंब या आगीमुळे उघड्यावर आले.
आर्णी येथे आगीत घर भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 11:22 PM
येथील शास्त्रीनगरात आगीत संपूर्ण घर भस्मसात झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. त्यात दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. या घरात झोपलेले १६ वऱ्हाडी लहान मुलीच्या सतर्कतेने सुदैवाने बचावले.
ठळक मुद्देदोन लाखांचे नुकसान : घरात झोपलेले १६ वऱ्हाडी बचावले