लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: यवतमाळ व नांदेड जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या प्रसिद्ध माहूर गडावर शुक्रवारी पहाटे लागलेल्या आगीत सुमारे १० लाखांचे सामान जळून खाक झाले आहे. या अपघातात कुठलीही जिवीतहानी झाली नाही.माहूर येथील श्री दत्तशिखर संस्थानच्या गोदामास शॉट सर्किटने आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी ४ :०० ते ४:३० च्या दरम्यान घडली. या आगीमध्ये दत्तशिखर संस्थानच्या साडी, पातळे व नारळ प्रसादासह फर्निचर जळून खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर घटनेचा मंडळ अधिकारी येरावार यांनी पंचनामा केला आहे.या घटनेची माहिती प्राप्त होताच माहूर न.प. च्या मुख्याधिकारी विद्या कदम व कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांनी तत्काळ घटनास्थळी हजेरी लावली व माहूर नपच्या अग्निशमन दलाचे वाहनासह किनवट, पुसद, उमरखेड येथील अग्निशामक दलास पाचारण करून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी माहूर, महागाव येथील रुग्णवाहिका व श्री रेणुकादेवी संस्थानची रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती. बचाव कायार्साठी रेणुकादेवी संस्थानचे सचिव किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी शक्ती कदम व तहसीलदार विक्रमसिंग राजपूत यांनी रेणुकादेवी संस्थानच्या सुरक्षा रक्षकांची चमू पाठवली होती.घटनेचे वृत्त परिसरात समजताच तहसीलदार विक्रमसिंग राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष मेघराज जाधव, प्राचार्य भगवानराव जोगदंड आदीसह बहुतांश राजकीय, सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते व दत्तभक्तांनी दत्तशिखर मंदिराकडे धाव घेऊन बचावकार्यात उडी घेत आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले त्यात नायब तहसीलदार उत्तमराव कागणे, माहूरचे नगरसेवक इलियास बावाणी संस्थानचे कर्मचारी भागवत म्हस्के, संजय सुरोशे, दत्ता मोरे, अॅड.श्याम गावंडे, प्रा.प्रवीण बिरादार, आनंद तुपदाळे न.प. कर्मचाऱ्यांचे पथक, दत्तशिखर संस्थानचे सर्व कर्मचारी व दत्तभक्त आदीसह बहुसंख्य नागरिकांचा समावेश होता. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आग लवकर आटोक्यात आली असून या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाहीश्री क्षेत्र माहूरचे महत्त्वमाहूर हे देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असून येथील पीठाची देवता रेणुकादेवी आहे. तसेच दत्तात्रेय आणि परशुराम यांचीदेखील प्राचीन मंदिरे माहूरगडावर आहेत. येथे मंदिरासमोरच एक किल्ला आहे. माहूर हे नांदेड शहरापासून १३० किलोमीटर अंतरावर आहे. चहूबाजूंनी डोंगरांनी आणि घनदाट जंगलांनी वेढले आहे.
माहूरगडावरील दत्तशिखर संस्थानाच्या गोदामास आग; लाखो रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 2:16 PM
यवतमाळ व नांदेड जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या प्रसिद्ध माहूर गडावर शुक्रवारी पहाटे लागलेल्या आगीत सुमारे १० लाखांचे सामान जळून खाक झाले आहे. या अपघातात कुठलीही जिवीतहानी झाली नाही.
ठळक मुद्देआगीचे कारण गुलदस्त्यातजिवीतहानी नाही