सावळी सदोबाची घटना : १२ लाख रुपयांचे नुकसान सावळी सदोबा : आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा येथे आग लागून सहा दुकाने भस्मसात झाल्याची घटना शनिवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. या आगीत १२ लाख रुपयांचे नुकसान झाले असून गावकऱ्यांनीच ही आग आटोक्यात आणली. सावळी सदोबा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील दुर्गेश कर्णेवार यांच्या कपडे प्रेसच्या दुकानात शॉर्टसर्किटने शनिवारी रात्री आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत कैलास चव्हाण यांचे मिनल मोबाईल गॅलरी, रमेश आडे यांचे शुभम बूट हाऊस, संजय भगत यांचे अंजली केशकर्तनालय, रमेश जाधव यांचे साई ईलेक्ट्रॉनिक्स आणि विजय राठोड यांचे राजनशेष कॉम्प्युटर ही दुकाने भस्मसात झाली. हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात येताच गावकऱ्यांनी दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात यश मिळविले. या आगीत मिलन मोबाईलचे इन्व्हर्टर, कॉम्प्युटर जळाल्याने दोन लाखांचे नुकसान झाले. शुभम बूट हाऊसमधील सर्व साहित्य भस्मसात झाले. रात्री १ वाजता तालुका दंडाधिकारी सुधीर पवार, पारवाचे ठाणेदार अनिल राऊत यांनी घटनास्थळला भेट दिली. आग आटोक्यात आल्यानंतर उशिरा रात्री दिग्रस आणि पांढरकवडा येथील अग्निशमन पोहोचले होते. (वार्ताहर)
आगीत सहा दुकाने भस्मसात
By admin | Published: March 13, 2017 12:59 AM