शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

‘जोश’च्या पहिल्या दिवशी सखींनी गाजविल्या स्पर्धा

By admin | Published: January 08, 2017 12:59 AM

लोकमत-समाचार-टाईम्स सखी मंचच्यावतीने आयोजित ‘जोश’च्या पहिल्या दिवशी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवत

यवतमाळ : लोकमत-समाचार-टाईम्स सखी मंचच्यावतीने आयोजित ‘जोश’च्या पहिल्या दिवशी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवत आपल्यातील कलागुणांचे प्रदर्शन केले. येथील दर्डा मातोश्री सभागृहात आयोजित या स्पर्धेत पहिला दिवस गाजला तो सोलो नृत्य स्पर्धेने. स्वातंत्र संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी आणि सखी मंचच्या संस्थापक अध्यक्षा दिवंगत ज्योत्स्ना दर्डा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पहिल्या दिवशीच्या स्पर्धेला सुरूवात झाली. सर्वप्रथम डोहाळे गीत (पाळणा गीत) स्पर्धा झाली. सखींनी यात विविध डोहाळे गीत सादर केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक सरला चिद्दरवार, व्दितीय क्रमांक स्मीता गंधे आणि तृतीय क्रमांक विद्या बेहरे यांनी पटकाविला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून मेघा इसराणी, प्राप्ती चिंतावार यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत गंगा राठोड, विद्या बेहरे यांनी सखी मंचचे स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. यानंतर वाटण्यापासून नमकीन पदार्थ तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धे प्रथम क्रमांक कांचन निंबेकर आणि व्दितीय क्रमांक अ‍ॅड़ सरोज बरदेहे यांनी पटकाविला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून नंदा तलरेजा आणि अर्चना इसराणी यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत माला टाके व अल्पा व्यास यांनी सखी मंचचे स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले. यानंतर थर्माकोलपासून दागिने तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. यावेळी सखींनी थर्माकोलपासून सुरेख दागिणे तयार केले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक जयश्री तळणकर, व्दितीय क्रमांक योगीता उघडे आणि तृतीय क्रमांक कविता लढ्ढा यांनी पटकाविला. परीक्षक म्हणून पूजा बाजोरिया आणि शोभा नेमाणी यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत अ‍ॅड़ सरोज बरदेहे आणि मेघा डाहे यांनी सखी मंचचे स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले. चिन्हाचा उपयोग करून रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक कांचन निंबेकर, व्दितीय दीपाली झोपाटे आणि तृतीय क्रमांक सीमा कोकेवार यांनी पटकाविला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून राखी खत्री, ज्योती गोल्हर यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत जयश्री मडावी, उषा सरमखे यांनी सखी मंचचे स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले. यानंतर घेण्यात आलेल्या हास्य नाटिका स्पर्धेत प्रथम क्रमांक छाया राठी व अरुणा चांडक यांनी तर व्दितीय क्रमांक माला टाके व अल्पा व्यास यांनी पटकाविला. परीक्षक म्हणून शुभदा हातगावकर, विद्या बेहरे यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत स्मीता गंधे यांनी सखी मंचचे स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले. सायंकाळी दर्डा मातोश्री सभागृहात सोलो डान्स स्पर्धा घेण्यात आली. यावेळी सखींनी एकापेक्षा एक सरस नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मानसी सांगानी यांनी पटकाविला. परीक्षक म्हणून आशंता बुटले यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत छाया राठोड यांनी सखी मंचचे स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले. स्पर्धेतील सर्व विजेत्या स्पर्धकांना लोकमत सखीमंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. (उपक्रम प्रतिनिधी) सखी मंच सदस्य नोंदणी लोकमत सखी मंचच्या सदस्य नोंदणी मोहिमेला सुरुवात झाली आहे. ५०० रुपये शुल्क भरुन सखींना सदस्य होता येणार आहे. सदस्य होणाऱ्या सखींना अंजली कंपनीचे फ्रायपॅन गिफ्ट दिले जाणार आहे. नोंदणीसाठी लोकमत सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा, दर्डानगर, लोकमत जिल्हा कार्यालय गांधी चौक यवतमाळ (०७२३२-२४८११९), सुषमा गणात्रा, आर्णी रोड (८०८७२३८४८७), शारदा गांधी, धामणगाव रोड (९९२३३३३६२०), अलका राऊत, जलाराम बाप्पा मंदिराजवळ, श्रीकृष्णनगर (९९२२६६१४८७), छाया राठोड, अंजनेय सोसायटी (७५०७६३०१७०), छाया राठी, आशुतोष अपार्टमेंट, सत्यनारायण ले-आऊट (९४२०६२२७९९) यांच्याशी संपर्क साधावा.