लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हिऱ्यांना पैलू पाडणारा प.विदर्भातील पहिला उद्योग नेरमध्ये कार्यान्वित झाला. मातोश्री डायमंड इन्स्टिट्यूट नावाने या उद्योगाचे औपचारिक उद्घाटन शिवसेना नेते, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते नुकतेच झाले.फल्ली तेल, चामडी चप्पल, दालमील यासाठी प्रसिद्ध असलेले नेर आता हिरे उद्योगाचे शहर म्हणून नावलौकिक मिळवेल, असा विश्वास ना.राठोड यांनी व्यक्त केला. या उद्योगामुळे तालुक्यात रोजगाराला चालना मिळेल, असे ते म्हणाले. हिरे उद्योगात काम करण्याचा अनुभव असलेले अनेक तरुण, महिला नेर, दारव्हा, दिग्रस तालुक्यात आहेत. नेरप्रमाणेच दारव्हा आणि दिग्रस येथेही लवकरच या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवणार असल्याची माहिती ना. राठोड यांनी यावेळी दिली. शेकडो बेरोजगारांना रोजगार देण्याची ग्वाही ना.राठोड यांनी याप्रसंगी दिली. अशी झाली हिरे उद्योगाची उभारणीनेर, दारव्हा, दिग्रस तालुक्यातील बहुतांश तरुण गुजरातमधील सुरत, गांधीनगर, अहमदाबाद आदी शहरातील हिरे उद्योगात रोजगारासाठी गेले आहेत. सहा महिन्यांपूर्वी आपण गुजरातमध्ये स्थलांतरित झालेल्या तिन्ही तालुक्यातील कामगारांचा सुरत येथे स्नेहमिलन सोहळा घेतला. यावेळी अनेक तरुणांनी गावात रोजगार उपलब्ध झाल्यास स्थलांतर करण्याची वेळ येणार नाही, असे सांगितले. भेटी दरम्यान गुजरातमधील काही हिरे व्यापाऱ्यांचीही भेट घेतली. यवतमाळ जिल्ह्यात हिऱ्यावर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण करण्यासंदर्भात व्यापाऱ्यांशी चर्चा केली. त्याचा पाठपुरावा करून पहिला हिरे उद्योग नेर येथे कार्यान्वित झाल्याचे ना.राठोड यांनी सांगितले.
प.विदर्भातील पहिला हिरे उद्योग यवतमाळच्या नेरमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 11:08 AM
हिऱ्यांना पैलू पाडणारा प.विदर्भातील पहिला उद्योग नेरमध्ये कार्यान्वित झाला. मातोश्री डायमंड इन्स्टिट्यूट नावाने या उद्योगाचे औपचारिक उद्घाटन शिवसेना नेते, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते नुकतेच झाले.
ठळक मुद्देरोजगाराला चालना गुजरातमधून येणार कच्चा माल