किशोर वंजारी।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: महाराष्ट्रात पहिल्यांदाच आयकॉनिक ग्रीन प्रशासकीय इमारती उभ्या राहात आहे. याचा पहिला मान नेर शहराला मिळाला आहे. सुसज्ज, देखणी अशी ही इमारत राहणार आहे. शिवाय गार्डन आणि पार्किंगची वैशिष्यपूर्ण सोय या ठिकाणी होणार आहे. लातूर पॅटर्नपेक्षाही अधिक भव्यता या वास्तूची राहणार आहे. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नाने या इमारतीच्या रुपाने नेरच्या वैभवात भर पडणार आहे.ग्रामपंचायत ते नगरपरिषद असा प्रवास झालेल्या नेर शहरात भव्य बसस्थानक, सोयींनीयुक्त रुग्णालय, विश्रामगृह, न्यायालय, नगरपरिषदेची देखणी इमारत विकासाची साक्ष देत आहे. या वास्तू शहराच्या विकासात भर टाकत असताना राज्यातील पहिली आयकॉनिक ग्रीन ४१०० चौरस मीटर इमारत येथे उभी राहणार आहे. दुय्यम निंबधक कार्यालय, कृषीविभाग, विखुरलेले महसूल कार्यालय कार्यालय एकत्र येणार आहे. यामुळे नागरिकांना कामे करणे सोपे जाणार आहे.आयकॉनिक ग्रीन इमारत तीन मजली राहणार आहे. २१ फूट डोम, दोन सभागृह, फर्निचर, भरपूर प्रकाश देणारे लाईट, खिडक्या, बाहेर उद्यान व पार्किंग व्यवस्था या इमारतीत राहणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एस. डी. माही यांनी दीली. महाराष्ट्रात आयकॉनिक ग्रीन इमारतीचा मान नेर शहराला मिळण्यासाठी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचे प्रयत्न आहे. पंचायत समितीची ईमारतही आयकॉनिक ग्रीन होणार आहे. या इमारतीत शिक्षण, बांधकाम, बालविकास प्रकल्प, पशुधन विभाग ही विखुरलेली कार्यालये एकत्र येतील, अशी माहिती माही यांनी दिली.
यवतमाळ जिल्ह्यातील नेरमध्ये राज्यातील पहिली आयकॉनिक ग्रीन इमारत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 9:54 AM
महाराष्ट्रात पहिल्यांदाच आयकॉनिक ग्रीन प्रशासकीय इमारती उभ्या राहात आहे. याचा पहिला मान नेर शहराला मिळाला आहे.
ठळक मुद्देदेखणी व सुसज्ज वास्तू एकाच ठिकाणी सर्व प्रशासकीय कार्यालये