लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कारंजा घाडगे येथे पहिले राज्यस्तरीय कीर्तन संमेलन स्पर्धेच्या रूपात पार पडले. यात राज्यातील नामवंत बालकीर्तनकार सहभागी झाले होते. या स्पर्धेत पहिली येण्याचा मान येथील सई पंचभाई हिने प्राप्त केला. ११ वर्षाची सई ही वर्ग पाचची आणि यवतमाळ पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी आहे.हभप सई हिने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ‘जन्माशी येओनी मरणे फुकाशी, हे ते शहाण्याचे काम नव्हे’ हा अभंग निवडला होता. तिला संवादिनीवर चंद्रकांत राठोड आणि तबल्यावर सौरभ देवधर यांची साथ लाभली. ही स्पर्धा वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्ट व लटारे महाराज भजन मंडळ कारंजा यांच्यातर्फे घेण्यात आली.
राज्यस्तरीय कीर्तन स्पर्धेत सई पहिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 9:18 PM