लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात मत्स्य शेतीच्या माध्यमातून नीलक्रांती घडण्याचे संकेत मिळाले आहेत. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासन कामी लागले असून २५ हजार हेक्टर क्षेत्रावर मत्स्यशेती केली जाणार आहे. त्या दृष्टीने मत्स्य शेती कार्यशाळेचे आयोजन जिल्हा प्रशासनाने केले होते.जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मत्स्य शेती कार्यशाळा घेण्यात आली. यवतमाळ जिल्हा पूर्णत: खरिपाच्या पिकांवरच विसंबून आहे. अशा स्थितीत पारंपारिक शेती करताना त्याला मत्स्य शेती, रेशिम शेती, कुकुटपालन आदी व्यवसायांची जोड देण्याचा विचार करणे गरजेचे आहे. शेततळ्यांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या जलसाठ्यामुळे मत्स्य शेतीला जिल्ह्यात मोठा वाव आहे. त्या दृष्टीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने बुधवारी मत्स्य शेती कार्यशाळेचे आयोजन केले होते.जिल्ह्यात सर्व विभागांचे ५०० जलशय आहेत. यातून निर्माण झालेल्या २५ हजार हेक्टर जलाशयात मत्स्य शेती होऊ शकते. या कार्यशाळेला मत्स्य विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.विजय शिकरे, यांनी निलक्रांती योजनेत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मत्स्य व्यवसायाचे प्रकार, शोभिवंत मासे, पिंजऱ्यातील मत्स्य संवर्धन, जागेची निवड, पाणी व्यवस्थापन, पाणी व मातीचे गुणधर्म, तलावाची रचना, तलावातील बोटुकलीचे संचयन, मत्स्यबीज प्रकार, शासनाच्या विविध योजना याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले. मत्स पालनातून शेतकºयांच्या आर्थिक उन्नतीला हातभार लागणार आहे.कार्यशाळेला जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, ‘केम’चे प्रकल्प संचालक देवानंद खांदवे, सहाय्यक आयुक्त सुखदिवे उपस्थित होते. प्रास्ताविक टाटा ट्रस्टचे नंदकिशोर इंगोले यांनी केले. संचालन श्यामल नवघरे यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होेते.
२५ हजार हेक्टर क्षेत्रात प्रथमच मत्स्यक्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 9:37 PM
जिल्ह्यात मत्स्य शेतीच्या माध्यमातून नीलक्रांती घडण्याचे संकेत मिळाले आहेत. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासन कामी लागले असून २५ हजार हेक्टर क्षेत्रावर मत्स्यशेती केली जाणार आहे.
ठळक मुद्देनीलक्रांती योजना : आर्थिक उन्नतीच्या वाटेवर, कार्यशाळेचे आयोजन