शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

साडेपाच हजार युवक रोज जाताहेत तंबाखूच्या आहारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 7:00 AM

एकीकडे कोरोनामुळे सारा देश त्रस्त आहे. तर दुसरीकडे गेल्या कित्येक वर्षांपासून तंबाखूमुळे होणारे मृत्यू कोरोनापेक्षाही भयंकर असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. गुरुवारी शिक्षण विभागाच्या माध्यमातून देशभरातील तज्ज्ञांनी याबाबत ऑनलाईन मंथन केले.

ठळक मुद्देदेशात दरदिवशी ३५०० लोक तंबाखू सेवनाने मृत्यूमुखीशिक्षण विभागाची नोंद

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एकीकडे कोरोनामुळे सारा देश त्रस्त आहे. तर दुसरीकडे गेल्या कित्येक वर्षांपासून तंबाखूमुळे होणारे मृत्यू कोरोनापेक्षाही भयंकर असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. गुरुवारी शिक्षण विभागाच्या माध्यमातून देशभरातील तज्ज्ञांनी याबाबत ऑनलाईन मंथन केले. देशात दरदिवशी ५ हजार ५०० युवक पहिल्यांदा तंबाखूची चव चाखत असल्याची बाब या विचारमंथनात नोंदविण्यात आली.जीवघेण्या तंबाखूच्या व्यसनात अडकणाऱ्या युवकांची संख्या दररोज वाढत असल्याची आकडेवारी यावेळी समोर आली. तर त्याचवेळी केवळ तंबाखू सेवनाने देशात दरदिवशी ३ हजार ५०० लोक मृत्युमुखी पडत असल्याची गंभीर बाबही यावेळी पुढे आली. राज्याच्या शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, सलाम मुंंबई फाऊंडेशन आणि द युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने हा राष्ट्रीय स्तरावरील वेबिनार आयोजित करण्यात आला होता. तंबाखू कंपन्या निकोटीन उत्पादनांकडे तरुणांना आकर्षित करण्यासाठी हेतूपूर्वक आक्रमक रणनीती अवलंबत आहे. लहान वयातच मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची सवय लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे गंभीर मुद्दे यावेळी पुढे आले.महाराष्ट्र सरकार आणि सलाम मुंबई फाऊंडेशनच्या माध्यमातून ‘तंबाखूमुक्त शाळा’ उपक्रम राबविला जात आहे. त्याद्वारे आतापर्यंत आठ राज्यातील १ लाख ३७ हजार २३ शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले. ५८५ सेवाभावी संस्थाही या उपक्रमात सामील झाल्या. या माध्यमातून महाराष्ट्रात आतापर्यंत ३१ हजार ७०७ शाळा तंबाखूमुक्त झाल्याचा दावा यावेळी फाऊंडेशनतर्फे करण्यात आला.या वेबिनारमध्ये ५७९ सेवाभावी संस्था, शिक्षक, आरोग्य विभागातील अधिकारी यांच्यासह यवतमाळ जिल्ह्यातील अवधुत वानखेडे, संदीप कोल्हे, कैलास गव्हाणकर हे शिक्षक समन्वयकही सहभागी झाले होते.रविवारी तंबाखू विरोधी दिनी विशेष मोहीमरविवारी ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिवस आहे. विशेष म्हणजे, जागतिक आरोग्य संघटनेनेही यंदा ‘तंबाखू कंपन्यांच्या चक्रव्यूहातून युवकांना बाहेर काढणे’ ही मुख्य संकल्पना निश्चित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ३१ मे रोजी विशेष मोहीम राबविण्याचे वेबिनारमध्ये निश्चित करण्यात आले. तंबाखू सेवनाने कोरोनाचा प्रसार वाढू शकतो. त्यामुळे आपली शाळा, घर, गाव तंबाखूमुक्त करावे, असे आवाहन आरोग्य संचालक डॉ. साधन तायडे यांनी केले. त्यासाठी सर्व शिक्षकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी केले.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी