लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकवाहिनीचे कर्मचारी आज महामंडळ आणि सरकारच्या आडमुठ्या धोरणाचे बळी ठरत आहे. कर्मचाऱ्यांना कुठल्याही लाभासाठी आर्थिक अडचण आडवी आणली जात आहे. यात पगार असो वा महागाई भत्ता. मागील सहा महिन्यांपासून पगाराचा पिंगा सुरू आहे. कधी अर्धा तर कधी पगारच थांबविला जात आहे.महागाई भत्त्याचासुध्दा वांदा झाला आहे. यात कामगार कराराच्या तुरतुदीची वाट लावण्यात आली आहे. महामंडळाने याविषयी काहीही हालचाली केल्या नाही. आता तर कोरोनाचे निमित्तच सापडले आहे. पगारासाठीच पैसा नाही, तर महागाई भत्ता कोठून देणार, असेच महामंडळाचे उत्तर असणार आहे.महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना जुलै २०१९ पासून जाहीर झालेला पाच टक्के महागाई भत्ता डिसेंबर पेड इन जानेवारीपासून लागू केला आहे. मात्र कामगार करारात तरतूद असतानाही एसटी कर्मचाऱ्यांना हा भत्ता लागू करण्यात आलेला नाही. शिवाय जुलै ते सप्टेंबर २०१८ या तीन महिने कालावधीचा वाढीव दोन टक्के आणि जानेवारी ते सप्टेंबर २०१९ या कालावधीची वाढीव तीन टक्के महागाई भत्त्याची थकबाकी एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली नाही. या थकीत भत्त्यासाठी नोव्हेंबर २०१९ मध्ये राज्य पातळीवर संयुक्त विचारविनिमय बैठक झाली होती. त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. आता हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.करारातील तरतुदीनुसार लाभ मिळावेराज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना उत्सव, अग्रिम व महागाई भत्ता देण्याची तरतुद कामगार करारामध्ये आहे. दिवाळीच्या सणापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे अग्रिम १२,५०० रुपये देण्यात यावे, महागाई भत्त्याची थकीत सर्व रक्कम द्यावी, शासनाने लागू केलेला पाच टक्के महागाई भत्ता ऑक्टोबर २०२० च्या वेतनापासून लागू करावा आदी मागण्या एसटी कामगार संघटनेने केल्या आहेत. यासाठी एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे व अध्यक्ष संदीप शिंदे यांनी पत्र दिले आहे.
एसटी कामगारांना पाच टक्के महागाई भत्त्याच्या ह्यवाकुल्याह्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 5:00 AM
महागाई भत्त्याचासुध्दा वांदा झाला आहे. यात कामगार कराराच्या तुरतुदीची वाट लावण्यात आली आहे. महामंडळाने याविषयी काहीही हालचाली केल्या नाही. आता तर कोरोनाचे निमित्तच सापडले आहे. पगारासाठीच पैसा नाही, तर महागाई भत्ता कोठून देणार, असेच महामंडळाचे उत्तर असणार आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना जुलै २०१९ पासून जाहीर झालेला पाच टक्के महागाई भत्ता डिसेंबर पेड इन जानेवारीपासून लागू केला आहे.
ठळक मुद्देनऊ महिन्यांचा कालावधी लोटला : कामगार कराराच्या तरतुदीचा ह्यब्रेक डाऊनह्ण कायम