लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या व मृत्युचा आकडा आज पुन्हा वाढला असून गत २४ तासात जिल्ह्यात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. तर २४५ नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.आज मृत झालेल्या पाच जणांमध्ये यवतमाळ शहरातील ४९ वर्षीय पुरुष, यवतमाळ तालुक्यातील ३० वर्षीय महिला, पांढरकवडा शहरातील ६६ वर्षीय पुरूष, दारव्हा तालुक्यातील ६५ वर्षीय पुरूष आणि पुसद शहरातील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे.
नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या २४५ जणांमध्ये १६५ पुरुष व ८० महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील ४३ पुरुष व १८ महिला, यवतमाळ तालुक्यातील तीन पुरूष, उमरखेड शहरातील ११ पुरुष व सात महिला, वणी शहरातील पाच पुरुष व तीन महिला, आर्णी शहरातील ११ पुरुष व पाच महिला, बाभुळगाव शहरातील २४ पुरुष व पाच महिला, दारव्हा शहरातील १५ पुरुष व १४ महिला, दिग्रस शहरातील एक पुरुष, दिग्रस तालुक्यातील दोन पुरुष व दोन महिला, घाटंजी शहरातील सहा पुरुष व दोन महिला, घाटंजी तालुक्यातील एक पुरूष व दोन महिला, कळंब शहरातील तीन पुरुष व एक महिला, कळंब तालुक्यातील दोन पुरूष, मारेगाव शहरातील तीन पुरुष, नेर शहरातील तीन पुरुष व एक महिला, नेर तालुक्यातील एक पुरूष, पांढरकवडा शहरातील चार पुरुष व तीन महिला, पांढरकवडा तालुक्यातील तीन पुरूष, पुसद शहरातील १० पुरुष व १३ महिला, पुसद तालुक्यातील एक पुरूष, राळेगाव शहरातील सहा पुरुष व एक महिला, महागाव शहरातील पाच पुरूष व दोन महिला, महागाव तालुक्यातील एक महिला, तसेच जिल्ह्यातील अन्य ठिकाणचा एक पुरूष व एक महिलेचा समावेश आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून अॅक्टीव पॉझिटिव्ह आणि होम आयसोलेशन तसेच सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा प्राप्त झाला नसल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत अॅक्टीव पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या २२४ तर होम आयसोलेशन निरंक दाखविण्यात आले आहे. जिल्ह्यात १६४ मृत्युची नोंद असून सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात ३०६ जण भरती आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत ६३४४४ नमुने पाठविले असून यापैकी ६२०१४ प्राप्त तर १४३० अप्राप्त आहेत. तसेच ५५८६१ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.