ऑनलाईन लोकमतयवतमाळ : कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेमार्फत (आत्मा) येथील पोस्टल ग्राऊंडवर आयोजित पाच दिवसीय कृषी महोत्सवाचा बुधवारी समारोप झाला.समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ.एस.यू. नेमाडे, सहाय्यक संचालक डॉ.महेंद्र ढवळे, आत्माचे प्रकल्प संचालक दत्तात्रय काळे, कृषी विकास अधिकारी कैलास वानखेडे, प्रगतीशील शेतकरी पुरुषोत्तम गावंडे उपस्थित होते. यावेळी डॉ.नेमाडे यांनी शेतकऱ्यांसाठी हा पाच दिवसाचा महोत्सव घेण्यात आल्याचे सांगून यात शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, प्रगतशील शेतकरी आदींनी परिसंवाद व चर्चासत्राद्वारे शेतकºयांना मार्गदर्शन केले. विविध शेतकरी बचतगट, उद्योजक आदींनी यात सहभाग घेतल्याचे सांगितले. डॉ.ढवळे यांनी जिल्ह्यातील शेतकरी रेशिम शेतीकडे मोठ्या प्रमाणात वळत असल्याचे सांगून जिल्ह्याने रेशिम लागवडीचे उद्दिष्ट दिवसांतच पूर्ण केल्याचे सांगितले. रेशिम शेती हा शेतकºयांसाठी राजमार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.‘आत्मा’चे प्रकल्प संचालक दत्तात्रय काळे यांनी यापूर्वी धान्य महोत्सव झाला होता. मात्र गतवषीर्पासून कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून सर्वांच्या सहकार्याने महोत्सव यशस्वी झाल्याचे सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कोळपकर यांनी या महोत्सवाचा शेतकरी व ग्राहक या दोघांचाही फायदा झाल्याचे सांगितले.यावेळी अनिकेत काकडे, भूमिपुत्र शेतकरी गट, श्रीराम सेंद्रीय उत्पादक शेतकरी गट, जगदंबा माता सेंद्रीय शेतीगट, मंथन गजानन श्रीरसागर, जाणता राजा सेंद्रीय शेतीगट यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन गजानन घाटे, तर आभार जगदीश कांबळे यांनी मानले.
पाच दिवसीय कृषी महोत्सवाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 11:51 PM
कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेमार्फत (आत्मा) येथील पोस्टल ग्राऊंडवर आयोजित पाच दिवसीय कृषी महोत्सवाचा बुधवारी समारोप झाला.
ठळक मुद्देतज्ज्ञांचे मार्गदर्शन : शास्त्रज्ज्ञ, कृषी अधिकारी, उद्योजकांचा सहभाग