यवतमाळ : जिल्ह्यात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला होता. शुक्रवारी रात्री अकरा वाजता पासून यवतमाळ पावसाला सुरुवात झाली. कोसळधार असल्याने संपूर्ण शहरातील रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरले ग्रामीण भागामध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने नागरिकांनी भीतीपोटी छतावर चढून रात्र काढली.
जिल्ह्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. बचाव पथकालाही पाण्यामुळे काम करता आले नाही. पहाटे पाच नंतर जोर कमी होत गेला, तेव्हा बचाव पथकाला पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढता आले. यवतमाळ शहरवासीयांनी इतका पाऊस व पूरस्थिती गेल्या ४९ वर्षात अनुभवीली बघितली नसल्याचे सांगितले जात आहे.
संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली होती. शहरातील प्रमुख महामार्गांवरूनही पाण्याची लोंढे वाहू लागले होते. त्यामुळे वाहन जागेवरच थांबली होती. बोरी तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग बंद आहे दहीसावळी तालुका महागाव येथील पुलावरून पंधरा फूट पाणी वाहत आहे. शासनाने इशारा दिल्यानंतर सकल भागातील नागरिक रात्रीच बाहेर पडले त्यामुळे काही ठिकाणी अनुचित प्रकार टळला. अनेक घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे पावसात भिजून मोठे नुकसान झाले. शेतात पूर गेल्याने पीक व शेत जमीन खरडून गेली आहे. नेमके नुकसान किती झाले याचा अंदाज बांधणे ही कठीण आहे. पावसाचा जोर कमी असला तरी पाऊस सुरू आहे.
बोरगाव डॅम परिसरात नागरिक छतावर
बोरगाव डॅम परिसरात नागरिक छतावर होते शुक्रवारी रात्री पावसाला सुरुवात झाल्यानंतर बोरगाव डॅम पूर्णतः भरला पायथ्या लागत असलेल्या घराला पाण्याचा वेढा पडला