आॅनलाईन लोकमतयवतमाळ : इमरजन्सी लावून, चर खोदून पाणी ओढण्याची क्षमताही संपल्याने आता अखेरचा उपाय म्हणून निळोणा आणि चापडोह प्रकल्पात तरंगते पंप लावले जाणार आहे. या आधारे पिण्याच्या पाण्याची महिनाभराची सोय होणार आहे. पण, पाणी १५ किंवा त्यापेक्षाही अधिक दिवसानंतरच मिळणार आहे. शहरात विकास कामांची घाई सुरू आहे. मशीनने होणाऱ्या कामांमुळे पाईपलाईन फुटत आहे. हा प्रताप नळ सोडल्यानंतरच लक्षात येत असल्यानेही पाणी वितरण बिघडत असल्याचे सांगितले जाते.चापडोह प्रकल्पातून शहराच्या ६० टक्केपेक्षा अधिक भागाला पाणीपुरवठा होतो. वाघापूर नाका, पिंपळगाव, वैभवनगर, दर्डा नगर, सुयोगनगर आणि लोहारा ग्रामपंचायतीच्या आवारात असलेल्या दोन टाक्या याच प्रकल्पाच्या पाण्याने भरल्या जातात. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला असताना त्यातून तीन पंपाद्वारे दर तासाला सात लाख २० हजार लिटर पाण्याचा उपसा केला जातो. आता केवळ एक पंप सुरू आहे.निळोणा प्रकल्पाचीही स्थिती यापेक्षा वेगळी नाही. या प्रकल्पातून गोदनी रोडवरील दोन मोठ्या टाक्या भरल्या जातात. मागील काही वर्षांपासूनच हा प्रकल्प दगा देत आहे. प्रकल्पातील पाणी चर खोदून आणत असल्याने आता दर तासाला तीन लाख लिटरही पाण्याचा उपसा होत नाही.पाणी संपल्याने अनेकदा फुटबॉल बंद पडते. ओढलेले पाणी फिल्टर करून टाकीत सोडणे आणि पाणीपुरवठा करणे या प्रक्रियेला १२ तासांचा अवधी लागत आहे. चार तासांच्या पाणीपुरवठ्यानंतर रिकामी झालेली टाकी भरण्यासाठी दुसऱ्याच दिवसाची वाट पाहावी लागते. एका टाकीद्वारे सहा ते सात भागांना पाणीपुरवठा होतो.वाघापूर नाक्यावर असलेल्या टाकीतून अग्रवाल ले-आऊट, चांदोरेनगर, मोहा आदी धामणगाव रोडवर असलेल्या भागाला पाणीपुरवठा होतो. आता या भागाला १२ मार्च किंवा त्यानंतरच पाणीपुरवठा होणार आहे. या टाकीवरील पूर्ण भागात पाणी सोडल्यानंतर उर्वरित टाक्यांवर असलेल्या भागाला पाणी वितरण होणार आहे. मजीप्रा कार्यालयाच्या आवारात असलेल्या दोनही टाक्यावरून शहराच्या जुन्या भागासह, मोहा, उमरसरा या भागांना पाणी दिले जाते. दर्डानगर टाकीवरून ६ ते ८ मार्च या कालावधीत पाणीपुरवठा केला जाणार आहे. यात जाम रोड, ओम कॉलनी, श्रमिक सोसायटी, मुलकी आदी भागांचा समावेश आहे.चापडोह आणि निळोणा प्रकल्पात तरंगते पंप लावण्याची प्रक्रियाही वांद्यात आली होती. त्यातून मार्ग निघाला आहे. दोनही प्रकल्पामध्ये ३१५ एमएमचे प्रत्येकी सहा तरंगते पंप लावले जाणार आहे. अधिकाधिक पाणी वेलपर्यंत आणण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे पाणीपुरवठ्याला गती येईल, असा विश्वास प्राधिकरणाकडून व्यक्त केला जात आहे.पाण्याचा अपव्यय थांबविण्याची गरजभीषण टंचाईला सामोरे जावे लागत असतानाही यवतमाळ शहरात पाण्याचा अपव्यय सुरू आहे. नळ आल्यानंतर गाड्या धुणे, अंगणात शिंपडने, झाडांना पाणी टाकणे कमी झालेले नाही. रात्री नळाचा कॉक सुरू करून ठेवला जातो. टाकी भरल्यानंतर त्यातून पाणी धो-धो वाहत राहते. या विषयी दक्षता घेतल्यास पाण्याचा अपव्यय टाळला जाऊ शकतो.कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावनापाणीपुरवठ्यातील अनियमितता कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी ठरत आहे. त्यांना लोकांच्या संतापाला सामोरे जावे लागत आहे. एका कामगाराने तर भीतीपोटी काम सोडल्याची माहिती आहे. मोर्चा धडकल्यास पोलिसांची मदत मागितली जाते. पोलीस पोहोचेपर्यंत लोकांनी राग व्यक्त केलेला असतो. या सर्व प्रकारामुळे कर्मचाºयांमध्ये भीती आहे. लोकप्रतिनिधींनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
निळोणा व चापडोहात तरंगते पंप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 11:15 PM
इमरजन्सी लावून, चर खोदून पाणी ओढण्याची क्षमताही संपल्याने आता अखेरचा उपाय म्हणून निळोणा आणि चापडोह प्रकल्पात तरंगते पंप लावले जाणार आहे.
ठळक मुद्देमहिनाभराची सोय : विस्कळीत पाणीपुरवठा नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न