विठ्ठल पाईलवार ।लोकमत न्यूज नेटवर्कझरी : वाघाचे नाव जरी घेतले तरी, चांगल्या चांगल्यांची बोबडी वळते. मात्र प्रत्यक्षात वाघानेच पाठलाग सुरू केला तर...? तालुक्यातील डोंगरगावच्या शेतशिवारात एका शेतकºयाने रविवारी रात्री असा थरार अनुभवला. या घटनेने आता पंचक्रोशी दहशतीखाली वावरत आहे.रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास डोंगरगाव येथील नामदेव तानबा राऊत हे आपल्या शेताची रखवाली करण्यासाठी जंगला शेजारी असलेल्या शेतात जागली गेले. या दरम्यान, शेतात एक पट्टेदार वाघ शिरला. वाघाला पाहून घाबरलेल्या नामदेवरावांनी हिम्मत एकवटून वाघाला शेतातून हुसकावून लावणाचा प्रयत्न केला. मात्र वाघ तो वाघच शेवटी. वाघाने थेट नामदेवरावांवर चाल केली. त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे जीव वाचवित त्यांनी शेतातील माळोशी (आटारी) वर चढून आरडाओरड सुरू केली. आजुबाजूच्या शेतातील लोक आवाजाने धावून आले. एकच हलकल्लोळ उडाला. त्यामुळे वाघानेही माघार घेत तेथून जंगलाकडे धूम ठोकली.तालुक्यातील डोंगरगाव परिसरात वाघाने दोन वर्षापूर्वी एकाचा जीव घेतला होता. या घटनेनंतर अद्यापही हल्लेखोर वाघ याच भागात असून यामुळे शेतकरी वर्गात दहशत पसरली आहे. तालुक्यातील पवनार, डोंगरगाव हा जंगली व बंदी भाग आहे. वाघासाठी या भागात पाण्याचे स्रोतही आहेत. त्यामुळे वाघ या परिसरात भटकत असतो. अनेक पाळीव प्राणीही या वाघाने फस्त केले आहे. याबाबत नामदेव राऊत यांचा मुलगा पवन याने वनविभागाला माहिती दिली. मात्र अद्यापही वन विभागातर्फे वाघाच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना आरंभल्या नाहीत. या परिसरात अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे या भागात वाघ-मानव संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. यातून जनक्षोभ उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.हा परिसर जंगलाने व्यापला असून या भागात वन्यजीवांची संख्या मोठी आहे. येथे बिबटाचाही वापर आहे.वाढत्या हल्ल्याच्या घटनांनी दहशतझरी तालुक्यात आतापर्यंत दुभाटी येथील एक महिला व डोंगरगाव येथील एक पुरुष या हल्ल्यात ठार झाले, तर शिबला येथील एक इसम गंभीर जखमी झाला. या घटनेच्या भयातून आताही त्यांचे कुटुंब सावरले नाही. मांगली व हिरापूर येथील तिघांना एकाच दिवशी वाघाने जखमी केल्याची घटना ताजी आहे. मार्की येथेही शेतात काम करताना चौघावर वाघाने हल्ला चढविला होता. दिवसेंदिवस वाघाचे वाढणारे हल्ले बघता वन विभागाने या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
शेतात शिरलेल्या वाघाने केला शेतकºयाचा पाठलाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 10:06 PM
वाघाचे नाव जरी घेतले तरी, चांगल्या चांगल्यांची बोबडी वळते. मात्र प्रत्यक्षात वाघानेच पाठलाग सुरू केला तर...? तालुक्यातील डोंगरगावच्या शेतशिवारात एका शेतकºयाने रविवारी रात्री असा थरार अनुभवला.
ठळक मुद्देडोंगरगाव जंगलातील थरार : दोन वर्षात घेतला दोघांचा बळी, आठ जणांना केले गंभीर जखमी