शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

तब्बल ३७ लाख शेतकऱ्यांचे रेशन थांबले; १४ जिल्ह्यांत प्रश्न गंभीर

By रूपेश उत्तरवार | Published: December 12, 2022 10:57 AM

भारतीय खाद्य निगमचा रेड सिग्नल

यवतमाळ : भारतीय खाद्य निगमने १४ जिल्ह्यातील ३७ लाख शेतकऱ्यांचे धान्य रोखले आहे. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गहू आणि तांदूळ न मिळाल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे.

सन २०१३ मध्ये देशात अन्न सुरक्षा कायदा आला. २०१४ मध्ये राज्याने या कायद्याला मंजुरी दिली. २०१५ पासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. यातून अंत्योदय अन्न योजना आणि एपीएल शेतकरी गटाला धान्य वितरित करण्यात येत आहे. प्रत्येकांना किमान पाेटभर अन्न मिळावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश होता. यातूनच एपीएल शेतकरी गटातील शेतकऱ्यांना प्रती व्यक्ती पाच किलो धान्य वितरित केले जात होते.

दोन रुपये किलो दराने गहू आणि तीन रुपये किलो दराने तांदूळ या योजनेतून दिले जात होते. यामुळे कोरडवाहू शेतकरीदेखील निश्चिंत होते. मात्र, एपीएल शेतकरी गटाचे धान्य टप्प्याटप्प्याने थांबविण्यात आले आहे. यात जुलै महिन्यापासून गहू आणि सप्टेंबर महिन्यापासून तांदूळ राज्यातील शेतकऱ्यांना मिळाला नाही. यामुळे मागील सहा महिन्यांपासून या योजनेतील धान्य मिळाले नाही. एकीकडे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली असताना दुसरीकडे धान्य थांबल्याने ते चिंतेत सापडले आहे.

एफसीआयकडून कोटा न मिळाल्याने शेतकरी गटातील धान्याचे वितरण झाले आहे. वरिष्ठांकडे ही बाब मांडण्यात आली आहे. कोटा आला तर धान्याचे वितरण नक्की होईल.

- सुधाकर पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी, यवतमाळ

जिल्हा - कार्ड संख्या - लाभार्थी

  • अकोला - ४०,७७६ -१,६०,५७६
  • अमरावती - १,०९,३७२ - ४,५६,४२८
  • औरंगाबाद - ७४,०४९ - ३,४२,३१८
  • बीड - १,३५,३३६ - ५,५०,१५४
  • बुलढाणा - ८४,१७१ - ३,५१,६०८
  • हिंगोली - ३७,७६३ - १,६८,४८१
  • जालना - २९,४०३ - १,३२,५९७
  • लातूर - ५७,२३२ - २,७४,८५६
  • नांदेड - ८८,६८० - ३,६५,५९३
  • उस्मानाबाद - ५२,८४७ - २,४६,४९८
  • परभणी - ५२,३९३ - २,३२,७९३
  • वर्धा - १०,८३६ - ४४,३६९
  • वाशिम - ९,८०६ - ७७,९३२
  • यवतमाळ - ८७,१६९ - ३,४९,५६०

एकूण - ८,७९,८५७ - ३७,५२,८३४

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी