शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

ट्रकच्या धडकेत युवक जागीच ठार

By admin | Published: August 09, 2015 12:07 AM

येथून वरोराकडे जाणाऱ्या रेल्वे क्रासींगसमोर समोर शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दुचाकीला जबर धडक दिली.

घटनास्थळी तणाव : उत्तरीय तपासणी नाही, रूग्णालयात गर्दीवणी : येथून वरोराकडे जाणाऱ्या रेल्वे क्रासींगसमोर समोर शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीवर मागे बसून असलेला २७ वर्षीय युवक अंकुश अशोक विखनकर हा जागीच ठार झाला, तर दुचाकी चालक गोपाल विठठ्ल होले गंभी जखमी झाला. या अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला होता.येथील एकतानगरातील मृतक अंकुश विखनकर आणि त्याचा मित्र जखमी अशोक होले हे दोन युवक शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास एम.एच.२९-ए.पी.८२७९ या दुचाकीने वरोरा मार्गावरील गुंजेच्या मारोतीच्या दर्शनाला जात होते. त्याचवेळी मागून कोलारपिंपरी कोळसा खाणीतून कोळसा भरून आलेला १२ चाकांचा एम.एच.४0-वाय.७८६६ हा हायवा ट्रक भरधाव वेगाने येत होता. या ट्रकने रेल्वे क्रॉसिंगसमोर दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकी चालक अशोक होले दूर फेकला गेला, तर अंकुश विखनकर हा ट्रकच्या समोरील चाकाखाली दबून तो जागीच ठार झाला. ट्रक चालकाने तेथून लगेच पळ काढला. अपघाताची माहिती कळताच एकतानगरमधील अनेक नागरिक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ट्रकच्या काचा फोडल्या. वाहतूक पोलिसही त्वरित तेथे पोहोचले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. नागरिक व जखमी अशोकने अंकुशला त्वरित येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर घटनास्थळ आणि रूग्णालयात गर्दी गोळा झाली होती. तेथे तणाव निर्माण झाला होता.मृतक अंकुशच्या कुटंबाला १0 लाखांची नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यंत त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करू न देण्याची भूमिका नागरिकांनी घेतली. त्यामुळे रूग्णालय परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. ट्रक चालक पोलीस ठाण्यात पोहोचून त्याने अटक करवून घेतली. त्याच्याविरूद्ध भादंवि २७९, ३३७, ३0४ अ, १३४, आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान अंकुशच्या मृतदेहाची वृत्तलिहिस्तोवर उत्तरीय तपासणी झाली नव्हती. मृतकाचे वडील रीक्षा चालक, तर आई घरकाम करते. त्याला एक लहान भाऊ आहे. (प्रतिनिधी)