आॅनलाईन लोकमतयवतमाळ : १८६४ पासूनचा इतिहास असलेल्या शासनाच्या वन खात्याकडे स्वत:चा शूटरही नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाची शिकार करण्यासाठी वन खात्याला चक्क हैदराबादचा खासगी शूटर नवाबला पाचारण करावे लागले आहे.राळेगाव तालुक्यात आत्तापर्यंत या वाघाने नऊ जणांचे बळी घेतले. त्यामुळे वाघाची प्रचंड दहशत असून वर्षभरापासून ग्रामस्थ भयभीत आहे. शेतीची कामे ठप्प झाली असून अनेक जण गावाबाहेर पडण्यास तयार नाही. वन विभागाची यंत्रणा केवळ वाघ पकडण्यासाठी तयारी करीत असल्याचे दर्शवित आहे. मात्र वाघ शोध पथकांना हुलकावणी देत आहे.वन विभागाच्या एका शोध पथकात एक शुटर, दोन ट्रॅकर (वाटाडे) आणि एक पशुवैद्यकीय तज्ज्ञासोबत एक वन परिक्षेत्र अधिकारी, दरोगा आणि दोन वन चौकीदार यांचा समावेश आहे. चार पथके जंगलात वाघाचा शोध घेत आहे. त्यात डब्ल्यूटीआय पथक कंम्पार्टमेट ७७, ७८, ७९, ८० मध्ये, डब्ल्यूसीटी कॅॅम्पार्टमेंट १५७, १५४, १५२ मध्ये, तर ताडोबाचे पथक कंर्म्पामेंट १५०, १४९ मध्ये फिरत आहे. विहिीरगाव कंम्पार्टमेंटमध्ये पेंच अभयारण्यातील पथक तैनात आहे. आता हैद्राबाद येथील ‘नवाब’च्या शोध पथकाला पाचारण केले आहे.
दुसऱ्याच वाघांनी केली जनावरांची शिकारवाघाचे वास्तव्य आढळणाऱ्या परिसरात तीन पिंजरे लावले गेले. सहा जनावरे (बेट) मोक्याच्या ठिकाणी बांधली आहे. आत्तापर्यंत शिकारीसाठी बांधलेल्या चार जनावरांची दुसऱ्याच वाघांनी शिकार केली. आता विहीरगाव परिसरावर पूर्ण लक्ष केंद्रीत केले असून ज्या भागात गायीची शिकार झाली, तेथून निघणाऱ्या पगमार्कवर शोध घेतला जात आहे. दिवसभराच्या सर्चनंतर शोध पथकांना रात्री जंगलाबाहेर पडावे लागते. त्यामुळे अडचणी येत असून दिवसेंदिवस नरभक्षक वाघाची दहशत वाढत आहे.