लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकरिता नवीन अभ्यागत मंडळाची निवड करण्यात आली आहे. आमदार डाॅ. वजाहत मिर्झा यांच्या रूपाने पहिल्यांदा वैद्यकीय पदव्युत्तर अध्यक्ष लाभला आहे. अभ्यागत मंडळ स्थापनेचा मुद्दा लावून धरण्यात आला होता.या अभ्यागत मंडळाच्या कार्यकारिणीत आमदार इंद्रनील नाईक, महिला प्रतिनिधी, महिला सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी प्रकाश पानपट्टे, तज्ज्ञ व्यक्ती म्हणून डॉ. महेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ता म्हणून राजेंद्र गायकवाड, विकास क्षीरसागर, हरिश कुडे, शाहीद हिराणी, वृत्तपत्र प्रतिनिधी म्हणून सुरेंद्र राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत पदसिद्ध सदस्य म्हणून रुग्णालयाचे अधिष्ठाता, आरोग्य सेवा उपसंचालक, नगरपालिकेतील आरोग्य सभापती, वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी व महाविद्यालयातील विभाग प्रमुख हे राहणार आहेत. अभ्यागत मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डाॅ. वजाहत मिर्झा हे स्वत: त्वचा रोग तज्ज्ञ आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवेसंदर्भातील सूचना मांडण्यासाठी प्रभावी ठरणार आहे. याशिवाय रुग्णालयात सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटल सुरू होण्याच्या प्रक्रियेत आहे. राज्य शासनाने ८८८ पदांना मान्यता दिली आहे. त्यामुळे येथे लवकरच पदभरती प्रक्रियाही होणार आहे. या पार्श्वभूमीवर नव्या अभ्यागत मंडळाला रुग्णसेवा आणखी लाेकाभिमुख करण्यासाठी संधी उपलब्ध होणार आहे. या समितीवर पुसदचे वर्चस्व असल्याचे मानले जाते.
‘मेडिकल’च्या अभ्यागत मंडळ कार्यकारिणीचे गठन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 5:00 AM
या अभ्यागत मंडळाच्या कार्यकारिणीत आमदार इंद्रनील नाईक, महिला प्रतिनिधी, महिला सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी प्रकाश पानपट्टे, तज्ज्ञ व्यक्ती म्हणून डॉ. महेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ता म्हणून राजेंद्र गायकवाड, विकास क्षीरसागर, हरिश कुडे, शाहीद हिराणी, वृत्तपत्र प्रतिनिधी म्हणून सुरेंद्र राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत पदसिद्ध सदस्य म्हणून रुग्णालयाचे अधिष्ठाता, आरोग्य सेवा उपसंचालक, नगरपालिकेतील आरोग्य सभापती, वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी व महाविद्यालयातील विभाग प्रमुख हे राहणार आहेत.
ठळक मुद्देअध्यक्षपदी वजाहत मिर्झा : पहिल्यांदाच डाॅक्टर